नाशिक : गाणे हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे किंबहुना गाणे हा आमच्या मंगेशकर कुटुंबीयांचा श्वास आहे. आम्ही अनेक शहरांत गायनाचे कार्यक्रम केले. ठिकठिकाणी सत्कार सोहळे झाले. या नाशिकनगरीत शास्त्रीय गायन कार्यशाळेनिमित्त दोनदिवस भरभरून प्रेम दिले. माझा सत्कार केला. त्यामुळे माझ्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा सत्कार नसून नाशिककरांचा प्रेमळ स्नेहांचा अमूल्य ठेवा आहे, असे भावोद्गार ज्येष्ठ संगीतकार व गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी काढले.ग्लोबल व्हीजन इंटरनॅशनल स्कूल आणि बाबाज् थिएटर यांच्या संयुक्त विद्यमान पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा ८०व्या वाढदिवसानिमित्त रविवारी कुसुमाग्रज स्मारकात नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंगशकर बोलत होते. दरम्यान, याच कार्यक्रमात नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर झेंडे यांचाही ८१ वर्षपूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपल्या नाशिक शहरातील जुन्या आठवणींना उजाळा देताना मंगेशकर म्हणाले की, मी आणि मधुकर अण्णा झेंडे एकेकाळी नाशिकला आल्यावर एकाच खोलीत राहत होतो. एकत्र भाजी-भाकरी खात होतो. गोदाघाटावर फिरत होतो. त्या काळातील जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. याचा मला खूप आनंद झाला. हा आनंद शब्दात व्यक्त होणार नाही. गायन कार्यशाळेत आठ वर्षांच्या मुलीपासून ते ८० वर्षांच्या आजीबार्इंपर्यंत सर्वजण सहभागी झालेले पाहून खूप समाधान वाटले. माझ्या गुरुजींचे शब्द मला आठवले, चाल आठवली. हृदयनाथ मंगेशकरांनी गावोगावीगायन कार्यशाळा घ्यावी : झेंडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा झेंडे यांनी सत्कार सोहळ्यात उत्तर देताना सांगितले की, आजचा दिवस हा माझ्यासाठी ‘सोनियाचा दिनू’ आहे. हृदयनाथांसह संपूर्ण मंगेशकर कुटुंबाचा अनेकवेळा सहवास मला लाभला हे मी भाग्य समजतो. यावेळी अण्णा झेंडे यांनी अनेक जुन्या आठवणी सांगितल्या. त्याचप्रमाणे हृदयनाथ मंगेशकर यांनी ‘भावसरगम’ या कार्यक्रमाप्रमाणेच नवोदित गायकांसाठी शास्त्रीय गायनाच्या गावोगावी कार्यशाळा घ्याव्यात, अशी विनंती केली.
नाशिककरांचा स्नेह हा अमूल्य ठेवा ! हृदयनाथ मंगेशकर यांचे सत्कार सोहळ्यात भावोद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:09 AM
नाशिक : गाणे हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे किंबहुना गाणे हा आमच्या मंगेशकर कुटुंबीयांचा श्वास आहे. आम्ही अनेक शहरांत गायनाचे कार्यक्रम केले. ठिकठिकाणी सत्कार सोहळे झाले. या नाशिकनगरीत शास्त्रीय गायन कार्यशाळेनिमित्त दोनदिवस भरभरून प्रेम दिले. माझा सत्कार केला. त्यामुळे माझ्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा सत्कार नसून नाशिककरांचा प्रेमळ स्नेहांचा अमूल्य ठेवा आहे, असे भावोद्गार ज्येष्ठ संगीतकार व गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी काढले.
ठळक मुद्देनाशिककरांचा स्नेह हा अमूल्य ठेवा ! हृदयनाथ मंगेशकर यांचे सत्कार सोहळ्यात भावोद्गारग्लोबल व्हीजन इंटरनॅशनल स्कूल आणि बाबाज् थिएटर यांच्या संयुक्त विद्यमान पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा नागरी सत्कार