लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : येथील महिला हक्क संरक्षण समिती संचलित अनाथ मुलींच्या बालगृहात झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी बालगृहाच्या अध्यक्ष सुशीला शंकर अलबाड व अतुल शंकर अलवाड यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर महिला व बालविकास विभाग खडबडून जागे झाले आहे. गुरु वारी सकाळपासून विभागीय आयुक्त बी. टी. पोखरणकर घटनास्थळी तळ ठोकून आहेत. बालगृहाला टाळे लावण्यात आले आहे.गत तीन वर्षांपासून या ठिकाणच्या मुलींवर अध्यक्षांच्या मुलानेच लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीने केल्याने अजून काही मुली त्याच्या भक्षस्थानी सापडल्या किंवा कसे याबाबतच्या चौकशीसाठी खास महिला अधिकाऱ्यांकडून बंद खोलीत मुलींची विचारपूस करण्यात आली. या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर याच बालगृहात यापुर्वी घडलेले प्रकारही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दोन वर्षापुर्वी नजीकच्याच कापूरझीरा तलावात बुडून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदर मुलींचा मृत्यू अपघाताने नव्हे तर घातपाताने झाला असल्याचीही चर्चा आहे. तर पिडीत मुलीबरोबर इतरही मुलींना खुद्द संस्था अध्यक्षांच्या मुलाच्या अत्याचाराला बळी पडावे लागल्याचा आरोपकरण्यात येत आहे. याबाबत वारंवार तक्र ार करूनही दबावतंत्राचा वापर करून अध्यक्षाकडून प्रकरण दाबण्यात आल्याचे उघड झाले आहे. पिडीत मुलगी १८ वर्षाची झाल्याने तिला नाशिकच्या निरिक्षणगृहात दाखल केल्यानंतर तेथील अधिक्षकांकडे संबंधित मुलीने आपिबती कथन केल्याने संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली.जिल्हा सत्र न्यायाधिशांची भेटयेथील अनाथ बालगृहाला जिल्हा सत्र न्या. सुर्यकांत शिंदे, महीला व बाल न्यायालयाच्या न्या. श्रीमती भोर यांनी भेट देऊन मुलींची चौकशी केली. मात्र भेदरलेल्या मुली बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर सर्व मुलींना नाशिकला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पेठ येथील बालगृहाला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:25 AM