पांगरी : राज्य परिवहन महामंडळाने नाशिक-शिर्डी मार्गवर हिरकणी व शिवशाही बसचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे पासधारक विद्यार्थी, चारमाने व प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने नियमित बस बंद न करता त्या सुरळीत ठेवण्याची मागणी पासधारक विद्यार्थी व प्रवाशांनी केली आहे.सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील पांगरी, वावी, पाथरे, येथून नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच विद्यार्थी, कामगार व नोकरी निमित्त रोज सिन्नर, नाशिक येथे जाणाºयांची संख्या जास्त आहे. या सर्वांनी पास बसचा मासिक किंवा त्रैमासिक पास काढला आहे. परंतु, एस टी महामंडळाने काही नियमित असलेले गाड्याही शिवशाही किंवा हिरकणी केल्याने पास धारकांची चांगलीच हाल होत आहे. नियमित गाडीच्या वेळी बस स्थानकावर आल्यानंतर जर हिरकणी आली तर प्रवशांना दुसरी साधी बस येण्याची वाट पहावे लागते. त्यामुळे त्यांना नियमित साधी बस येईपर्यंत एक दीड तास ताटकळत उभे राहावे लागते.मुंबई, नाशिक येथून शिर्डीसाठी जाण्यासाठी बस आहेत. परंतु बºयाच आगाराने या गाड्या शिवशाही केल्यामुळे कोपरगाव किंवा सिन्नर आगाराचे गाड्यांची वाट पहावी लागते. तसेच कोपरगाव आगाराचे काही गाड्या हिरकणी केल्या असल्याने रोज फरक देऊन प्रवास करणे प्रवाशांना अवघड जात आहे. त्यामुळे साधी गाडीची वाट पाहण्याशिवाय पर्याय राहत नाही.हिरकणीचे बसचे पास व साधी गाडीच्या पासमध्ये बरीच तफावत असल्याने पास काढण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे हिरकणीचे पास काढत नाही. पांगरी येथून सकाळच्या वेळी ८ वाजेची शिर्डी- सेलवास बस गेल्यांनतर ९ वाजेच्या उरण शिवाय प्रवाशांना पर्याय रहात नाही. सकाळी आठ ते नऊ वाजे दरम्यानच्या सर्व गाड्या हिरकणी किंवा शिवशाही आहेत. जशी परिस्थिती सकाळी असते तसेच संध्याकाळी सिन्नर बस स्थानकावर येतानाही तसीच राहते. त्यामुळे नियमित बस सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शिर्डी मार्गावरील बस कायम ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 6:30 PM
राज्य परिवहन महामंडळाने नाशिक-शिर्डी मार्गवर हिरकणी व शिवशाही बसचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे पासधारक विद्यार्थी, चारमाने व प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने नियमित बस बंद न करता त्या सुरळीत ठेवण्याची मागणी पासधारक विद्यार्थी व प्रवाशांनी केली आहे.
ठळक मुद्देपासधारकांची गैरसोय : शिवशाही व हिरकणीचे प्रमाण वाढवले