नाशिक : नाशिक जिल्ह्यातून जात असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी संयुक्त मोजणीचे काम गावोगावी शेतकऱ्यांच्या विरोधानंतर पूर्णत्वाकडे चालले असून, इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला आपली हरकत कायम ठेवत मोजणी करू दिली आहे, तर सिन्नरला ८० टक्के काम पूर्ण झाले असून, शेवटच्या २० टक्क्यांत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन्ही तालुक्यांतील ४६ गावांमधून समृद्धी महामार्ग जाणार असून, लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यास याच ठिकाणी नवनगरेही साकारण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. तथापि, या महामार्गाची घोषणा झाल्यापासूनच जमीन मालक शेतकऱ्यांचा विरोध होऊ लागल्याने गेल्या आठ महिन्यांपासून जागा मोजणीच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत; मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये मोजणीचे काम पूर्ण होत असताना नाशिक जिल्ह्यात असलेली पिछाडी पाहता या संदर्भात मंत्रालयातून दबाव वाढल्याने प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने जमीन मोजणीचे काम हाती घेतले असून, कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात येणार असल्याने त्यादृष्टीने जोरदार तयारी करण्यात आली आहे.
हरकती ठेवून ‘समृद्धी’ची मोजणी पूर्णत्वाकडे
By admin | Published: April 07, 2017 6:04 PM