निवेदन : संपूर्ण दारुबंदी करण्याची मागणीनाशिकरोड : सर्वोच्चन्यायालयाने महामार्गावरील दारूबंदी व राज्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीच्या वतीने सोमवारी मुंबई-भुसावळ पॅसेंजरसमोर करण्यात येणारे रेल रोको आंदोलन पॅसेंजर रेल्वे निघून गेल्याने रेल रोको आंदोलन फसल्याने निवेदन देण्याची वेळ आली होती. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटर दारू विक्रीस केलेल्या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी व राज्यात दारूबंदी करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीच्या वतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल रोको आंदोलन करणार होते. मुंबई-भुसवळ पॅसेंजर ही प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आपल्या निर्धारित वेळेला आली व निघून गेली. आंदोलक उशिराने रेल्वेस्थानकात पोहचल्याने आंदोलकांनी रेल्वे एक्स्प्रेससमोर आंदोलन करण्याची मागणी केली. मात्र रेल्वे पोलिसांनी त्यास ठाम नकार दिल्यामुळे दारूबंदी जनआंदोलन समितीचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेस्थानक प्रबंधक एम. बी. सक्सेना यांना निवेदन दिले. निवेदनावर सुभाष वाघ, माधवी पाटील, वैशाली मोजाड, पुंजा चांघूलकर, दीप्ती पाटील, श्रद्धा कासार, मीना बिडकर, वसंत बरकले, संतोष टिळे, यश बच्छाव, तुषार भोसले, सूर्यकांत भांगरे, तुषार भोसले, शेरूभाई मोमीन, विलास गायधनी, आशिष भोळे, संतोष ढमाले आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)आंदोलकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर घोषणा देत विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात दारूबंदी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आठ दिवसांत समिती स्थापन करून त्या समितीत दारूबंदी आंदोलनातील ३६ जिल्ह्यांचे प्रतिनिधी घ्यावेत, धार्मिक स्थळांच्या पाचशे मीटर परिसरात दारूबंदी लागू करावी, मद्याचे नवीन परवाने देऊ नयेत, दारूमुळे उद््ध्वस्त झालेल्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घ्यावी आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.
‘रेल रोको’ ऐवजी केली निदर्शने
By admin | Published: April 11, 2017 1:40 AM