खमताणे : केळझर धरणातून आरम नदीत पाण्याचे आवर्तन सोडल्याने बागलाण तालुक्यातील दुष्काळग्रस्त व तृषार्त जनतेला दिलासा मिळाला आहे. १७० क्यूसेक पाणी आरम नदीत सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. केळझर आवर्तनाने आरम खोऱ्यातील डांगसौदाणे, कंधाणे, निकवेल, खमताणे,मुंजवाड, मळगाव, सटाणा, आराई, चौधांणे आदि गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. यापूर्वी शेतीसाठी जानेवारी व फेब्रुवारीच्या सुरूवातीला दोन आवर्तन सोडल्याने रब्बी हंगाम पार पडला. ५७२ दशलक्ष घनफूट शमता असलेल्या केळझर धरणावर नदीकाठच्या पाणीयोजनाच्या विहिरी पाण्याअभावी कोरड्या झाल्याने अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. केळझर धरणातून सोडलेले पाणी गावागावांत पोचतात पाणी पाहण्यासाठी गावोगावी ग्रामस्थांनी नदीकाठी गर्दी केली होती. या आवर्तनाने बागलाण तालुक्यातील पाणीटंचाईच्या झळा कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे आरम नदीकाठच्या ग्रामग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (१३ केळझर)
केळझरच्या आवर्तनाने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:56 PM