आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतच मिळाले विकास दरवाढीचे संकेत.
चालू आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये ७.५ टक्के घट होण्याची अपेक्षा. ऑक्टोबरमध्ये व्यक्त केलेल्या ९.५ टक्के घटीच्या अंदाजापेक्षा सुधारित अंदाज कमी.
चलनवाढीचा दर तिसऱ्या व चौथ्या तिमाहीमध्ये अनुक्रमे ६.८ आणि ५.८ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज.
आरटीजीएस प्रणाली लवकरच सप्ताहातील सातही दिवस पूर्ण वेळ होणार उपलब्ध.
जानेवारीपासून कार्डामार्फत संपर्करहित देवघेव करण्याची मर्यादा होणार दोनवरून पाच हजार रुपये.
सहकारी आणि व्यापारी बँकांना चालू वर्षामध्ये लाभांश वाटप करण्यास मनाई.