मनोज देवरे । लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : जून महिन्याचा दुसरा आठवडा संपला. तिसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. कसमादे पट्ट्यासह जळगावला पाणी पाजणाऱ्या चणकापूर धरणासह तालुक्यातील आठ लघुपाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला आहे.पुनंद प्रकल्पातील पाणी थेट मालेगाव तालुक्यातील टेहरेगावापर्यंत पोहोचविण्यात आल्याने पुनंद प्रकल्पात केवळ १०८ दशलक्ष घनफूट इतका अल्पपाणीसाठा शिल्लक आहे. मळगाव (चिंचपाडा), भेगू, धनोली, जामलेवणी लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये अल्प पाणीसाठा शिल्लक असून, नांदुरी, ओतूर, गोबापूर, मार्कंडपिंप्री, धार्डेदिगर, बोरदैवत, भांडणे, खिराड लघुपाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला असून, तालुक्यातील भूजल पातळीदेखील खाली गेल्याने कधी नव्हे इतकी भीषण परिस्थिती कळवण तालुक्यात निर्माण झाली आहे. काही दिवसात पाऊस बरसला नाही तर तालुक्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल.कळवण तालुक्यात दोन मोठे धरणे व ११ मध्यम प्रकल्प आहेत, त्यांची एकूण साठवण क्षमता ५२०० दशलक्ष घनफूट इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला १५ जून २०१९ पर्यंत केवळ २४५ दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ४.७१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मळगाव (चिंचपाडा) लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ९२.६६ दशलक्ष घनफूट असून, आजफक्त ३.५ दशलक्ष घनफूट (२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे, तर भेगू लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ९७.६७ दशलक्ष घनफूट इतकी असून, आजमितीस ३६.९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.पुनंद परिसरात पाणीटंचाईपुनंद प्रकल्प परिसरातील बंधारपाडा, उंबरगव्हाण, शिरसापाडा, उंबºयामाळ, जांभाळ, महाल, उंबरदे, चोळीचा माळ, औत्यापाणी, धुमंदर, खळीचापाडा, गढीचा पाडा, मोºयाहूड या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत असून, शेजारील गुजरात राज्यात पाच किमी पायपीट करून पाणी आणून आदिवासी बांधवांना तहान भागवावी लागत आहे. दूषित पाण्याचा आसरा घेऊन दिवस काढले जात आहे.पुनंद धरणाखालील सुपले , शेरी, भैताणे, सावरपाडा, चिंचपाडा, पिंपळे, दह्याणे, गणोरे, सुळे, लखानी, जयदर, खडकी, प्रतापनगर या धरणाच्या काठाशी असलेल्या गावामध्ये पाणीटंचाई जाणवते. मालेगावसाठी पुनंदमधून पाणी सोडल्यानंतर या भागातील जनतेला दिलासा मिळाला आहे. सध्या अल्प साठा असल्याने भविष्यात या भागाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.लाखो लिटर पाण्याची वाहतूकशासनस्तरावर कळवण तालुका टँकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात कळवण तालुक्यातील पुनंदनगर व कातळगाव येथे सध्या टँकर सुरू असून, खांडवीपाडा, जिरवाडे (ओ.), ओतूर, दह्याणे (ओ.), आठंबे, सादडविहीर, भेंडी येथे पाणीटंचाई असल्यामुळे टँकरची सुरू करण्याची नामुष्की आली आहे. ओतूर परिसरात ओतूर, कळवण खुर्द, कुंडाणे, शिरसमणी भागातील विहिरी कोरड्याठाक पडल्याने या भागातील फळबागा व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर धावत आहे.चणकापूर धरणातील मोठा साठा मालेगावसाठी आरक्षित असतो. झालेला पाऊस आणि आरक्षित पाणी याव्यतिरिक्त जे पाणी शिल्लक राहू शकते त्याचा अंदाज करून पाणी आवर्तन दिले जाते. कळवण, बागलाण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजना या पाण्यावर अवलंबून आहे. पुनंद व चणकापूरमधून सध्या पाणी सोडल्याने पाण्याची तहान भागली आहे. चणकापूरमधील पाणीसाठा कमी झाल्यास पुनंद प्रकल्पातून पाणी घेऊन पाणी सोडले जाते. तत्कालीन परिस्थितीनुसार चणकापूरचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. आज पाण्याची मागणी वाढली आहे.सर्वच क्षेत्रात वाढ झाल्याने पाणी कमी पडू लागले आहे. आज मात्र चणकापूर धरण कोरडेठाक झाले असून, पुनंदमध्ये जेमतेम साठा आहे.धनोली लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता १७.५४ दशलक्ष घनफूट इतकी असून, आज २१.०७ दशलक्ष घनफूट (१४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.तर जामलेवणी लघुपाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ६२.८८ दशलक्ष घनफूट असून, आज ११.२२ दशलक्ष घनफूट (१८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
कळवणच्याआठ प्रकल्पांनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:18 PM
जून महिन्याचा दुसरा आठवडा संपला. तिसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. कसमादे पट्ट्यासह जळगावला पाणी पाजणाऱ्या चणकापूर धरणासह तालुक्यातील आठ लघुपाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला आहे.
ठळक मुद्देपाझर तलाव कोरडे भूजल पातळी घसरली; पाणीबाणीची स्थिती