खामखेडा : येथील शेतक-यांनी रस्त्यावर टमाटे व कांदे फेकून सरकारचा निषेध व्यक्त करत शेतकरी संपाला पाठींबा दिला. सध्या बाजारात शेतक-यांच्या कोणत्याही शेतीमालाला भाव नसल्याने कवडीमोल भावाने शेतीमाल विकला जात आहे.तेव्हा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही .त्यामुळे शेतकरी दिवसोंदिवस कर्ज बाजारी होत चालला आहे.तेव्हा शेतकरयांनी एक जून पासून कोणताही शेतीमाल बाजारात विक्र ीसाठी न नेता एक जून ते दहा जून पर्यत संप पुकारला आहे.तेव्हा देवळा तालुक्यातील खामखेडा येथील महामार्ग क्र मांक सत्तरावर खामखेडा येथील चौफुलीवर शेतकरयांनी रस्ता रोखो करून रस्त्यावर टमाटे व कांदे फेकून शेतकरयांनी संताप व्यक्त करण्यात शेतकरी संपात सहभाग नोंदवून राज्य शासनाच्या निषार्धात घोषणाबाजी करत संपाला पाठींबा देण्यात आला. यावेळी वसाकाचे माजी संचालक आण्णा पाटील, माजी सरपंच दादाजी बोरसे, संतोष मोरे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष रवींद्र शेवाळे विश्वास शेवाळे , शांताराम शेवाळे , बाळू मोरे, अरु ण शेवाळे, गणेश कासार, शंकर सूर्यवंशी, सुरेश शेवाळे , कारभारी शेवाळे, नरेंद्र सोनवणे, व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
खामखेड्यात शेतकऱ्यांनी रस्त्यावर टमाटे, कांदे फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 2:47 PM