खामखेडा : येथील श्रीक्षेत्र लायकेश्वर येथून संत श्रेष्ठ निवत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी पायी दिंडीने त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान केले.देवळा तालुक्यातील खामखेडा येथील श्रीक्षेत्रलायकेश्वर येथून त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी दिंडीचे संस्थापक ह.भ.प. गोरख महाराज, ह.भ.प. माजी सैनिक जयराम शेवाळे, ह.भ.प. सुभाष बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते . या पायी दिंडी सोहळ्यात सावकी, भऊर, पिळकोस,बगडू भादवन आदि परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. यंदाही २० जानेवारीपासून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची यात्रा भरत असल्याने श्रीक्षेत्र लायकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन पालखीचे त्र्यबकेश्वर कडे प्रस्थान झाले. या पालखीचे खामखेडा चौफुली जवळ स्वागत करण्यात आले तसेच गावात पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. सदर पायी दिंडी पिळकोस-बगडू-भेंडी-दहाने-कूडाने-बाबापुर-मावाडी-बापेगाव-पालखेड-मोहाडी-शिवनाई-म्हसरु ळ-नाशिक मार्गाने त्र्यंबकेश्वर येथे पोहचनार आहे. दिंडीतील भाविकांची दुपारच्या जेवणाची व्यवस्था बगडू, कुंडणे, मावडी, पालखेड, शिवनाई, नाशिक आदि ठिकाणी नागरिकांनी केली आहे तर रात्री मुक्कमाची व्यवस्था दहाने, बाबापुर, बापेगाव येथे करण्यात आलेली आहे. दिंडीतील वारकऱ्यांच्या चहा, नाश्ता,जेवनाची व्यवस्था त्या-त्या गावातील नागरिक दरवर्षी स्वयंस्फूर्तीने करत असतात.
खामखेडा येथून त्र्यंबकेश्वरी पायी दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 6:25 PM
प्रस्थान : पालखीचे घरोघरी भाविकांकडून पूजन
ठळक मुद्देयंदाही २० जानेवारीपासून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची यात्रा भरत असल्याने श्रीक्षेत्र लायकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पूजन