शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जिल्हा कॉँग्रेसमध्ये ‘खदखद’ कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:34 AM

तीन राज्यांमध्ये एकसंघटितपणे लढून विजय खेचून आणणाऱ्या कॉँग्रेसमधील नाशिक जिल्ह्यातील गटबाजी अद्याप कायम असून, त्याचा प्रत्यंतर खुद्द उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी व अखिल भारतीय कॉँग्रेसचे सचिव चेल्लर वामसी चांदरेड्डी यांनीच घेतला आहे.

नाशिक : तीन राज्यांमध्ये एकसंघटितपणे लढून विजय खेचून आणणाऱ्या कॉँग्रेसमधील नाशिक जिल्ह्यातील गटबाजी अद्याप कायम असून, त्याचा प्रत्यंतर खुद्द उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी व अखिल भारतीय कॉँग्रेसचे सचिव चेल्लर वामसी चांदरेड्डी यांनीच घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या जिल्ह्याच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे व ज्येष्ठ नेते दिगंबर गिते यांच्यात वरिष्ठ-कनिष्ठ दर्जावरून झालेल्या वादातून थेट प्रकरण हमरी-तुमरीवर आल्याने त्याची खमंग चर्चा होत आहे.तीन राज्यांतील निवडणुका जिंकल्यामुळे कॉँग्रेसने लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन महाराष्टत संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करून बूथनिहाय कार्यकर्ते नेमणुकीवर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तर महाराष्टÑाची जबाबदारी चांदरेड्डी यांच्यावर सोपविण्यात आली. चांदरेड्डी यांनी गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्टÑाची पदाधिकाºयांची बैठक घेतल्यानंतर जिल्हानिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली. त्याचाच भाग म्हणून तालुका, गाव व बूथनिहाय कार्यकर्ते नेमणुकीचा आढावा घेण्यासाठी रेड्डी यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी आठ वाजता शासकीय विश्रामगृहावर सर्व तालुका पदाधिकारी, आघाडी प्रमुख, तालुका निरीक्षकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पानगव्हाणे यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते यांची कळवण तालुका निरीक्षक म्हणून नेमणूक केल्याचे सांगताच गिते यांनी वयाचा व पक्ष कार्याचा विचार करून जबाबदारी सोपवावी, असे सुनावले. त्यावर पानगव्हाणे यांनीही गिते यांच्या ‘सिनीअर’की वर प्रश्न उपस्थित करून ‘आपण दलाली करत नाही किंवा कॉँग्रेसवर आपले पोट चालत नाही’ असे एकेरी भाषेत गिते यांचा पाणउतारा केला. प्रकरण हमरीतुमरीवर गेल्याने पदाधिकाºयांमध्ये चुळबुळ सुरू झाली तर पक्षनिरीक्षक चांदरेड्डी यांनी वाद पाहून कपाळावर हात मारून घेतला.कॉँग्रेसमधील या वादाची चांगलीच चर्चा सुरू झाली असून, मध्यंतरी जिल्हाध्यक्ष पानगव्हाणे यांची गच्छंती करावी यासाठी विरोधी गटाने केलेल्या प्रयत्नात गिते यांचाही समावेश होता. त्यामुळे तो राग पानगव्हाणे यांनी डोक्यात धरून त्यांचा पाणउतारा केला असला तरी, पानगव्हाणे यांनी पक्षाची वाट लावल्याचे पुरावे विरोधी गटाने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात बूथनिहाय नेमण्यासाठी कार्यकर्ते मिळत नसल्याने अक्षरश: मतदार यादीतील मतदारांचे नावे बूथ प्रमुख म्हणून टाकून रेकॉर्ड मेंटेन करण्यात आल्याचीही खुली चर्चा आता होऊ लागली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणNashikनाशिक