शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

गोंदे दुमाला येथील खंडेराव महाराज यात्रौत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 5:00 PM

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील मुख्य ग्रामदैवत असलेल्या खंडोबा महाराज यात्रौत्सवाचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामस्थांच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात आयोजन करण्यात येते. परंतू यावर्षी पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच यात्रौत्सव रद्द करण्यात आल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेला खंडोबा महाराज यात्रोत्सव यावर्षी ग्रामस्थांनी रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे उपसरपंच परशराम नाठे व मंदिराचे मुख्य पूजारी संजय नाठे यांनी सांगितले. मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभुमीवर जागरण गोंधळाचे कार्यक्रम स्थगित

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील मुख्य ग्रामदैवत असलेल्या खंडोबा महाराज यात्रौत्सवाचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामस्थांच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात आयोजन करण्यात येते. परंतू यावर्षी पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच यात्रौत्सव रद्द करण्यात आल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेला खंडोबा महाराज यात्रोत्सव यावर्षी ग्रामस्थांनी रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे उपसरपंच परशराम नाठे व मंदिराचे मुख्य पूजारी संजय नाठे यांनी सांगितले. मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात येणार आहे.इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील प्रसिद्ध असलेले खंडेराव महाराज यात्रौत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत रद्द करण्यात आला असून दरवर्षी यादिवशी गावातून खंडोबा महाराजांच्या मुर्तीची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येते. घरोघरी गोडधोड मिष्टान्नाचे पदार्थ बनवले जातात. त्याचप्रमाणे पुरणपोळीचा नैवैद्य खंडोबा महाराज यांना दाखवण्यात येतो.त्याचप्रमाणे यात्रौत्सवानिमित्त गावामध्ये भक्तीमय वातावरण असते. तसेच जागरण गोंधळ सारख्या कार्यक्रमांसह इतरही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या खंडेराव महाराज यात्रोत्सव काळात केले जाते. यात्रेच्या मुख्य दिवशी गोंदे दुमाला गावाचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबा महाराज यांच्या मुर्तीची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते.या मिरवणूकीमध्ये शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात येते. तसेच या मिरवणूकीचे मुख्य आकर्षण म्हणजे या मिरवणूकीमध्ये परिसरातील अनेक अश्वप्रेमी आपले अश्व घेऊन सहभागी होत अश्वांच्या नृत्यविष्काराच्या जुगलबंदीचा कार्यक्रम करण्यात येतो. हा कार्यक्रम पाहण्यासाठी जिल्ह्यातून तसेच परिसरातून अनेक भाविक गर्दी करत असतात.परंतू यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा यात्रौत्सव बंद करण्यात आल्यामुळे सर्वच कार्यक्रमांना भाविक मुकणार आहेत. मिरवणूक संपल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने खंडोबा महाराज यांना मुख्य पुजा-यांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन नैवैद्य दाखवण्यात येतो. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातुन देखील आलेले भाविक मनोभावे दर्शन केल्यानंतर आपली मनोकामना पुर्ण होण्यासाठी खंडोबा महाराज यांच्या चरणी लोटांगण घालतात.यानंतर संध्याकाळी भाविकांसाठी जागरण गोंधळाच्या माध्यमातून मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतू यावर्षी हे यात्रौत्सवात साजरे केले जाणारे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे भाविकांना यापासून मुकावे लागणार असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.(११ नांदूरवैद्य १, २)कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जागरण गोंधळाचे कार्यक्रम स्थगितकोरोनाच्या पार्श्वभुमीवर जागरण गोंधळाचे कार्यक्रम स्थगित

टॅग्स :TempleमंदिरSocialसामाजिक