चांदोरी : येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आराध्य दैवत खंडेराव महाराज यांचा शनिवारी (दि. २७) साजरा होणारा यात्रौत्सव कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याची माहिती खंडेराव महाराज मंदिर विश्वस्तांनी दिली. दरम्यान, या काळात मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.शेकडो वर्षांची परंपरा असलेले व प्रतिजेजुरी समजले जाणारे निफाड तालुक्यातील चांदोरी येथील खंडेराव महाराज यात्रा कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून यात्रा रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रतिबंध उपाययोजना व नियमावलीचे पालन करीत, मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे यात्रौत्सव रद्द करण्यात आला होता. याही वर्षी यात्रा कोरोनामुळे स्थगित करण्यात आली आहे.दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत खेळणी, पाळणे, सर्कस, मिठाई, मनोरंजन, खेळ, खाद्यपदार्थ, तसेच अन्य वस्तूंची शेकडो दुकाने थाटली जातात. उत्सवासाठी येणारे भाविक आणि स्थानिक नागरिक येथून मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या दुकानदारांना उत्पन्न मिळते. यंदा मात्र ही यात्रा रद्द झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, तसेच स्थानिक नागरिकांना दर्शन घेण्यासाठी बाहेर न पडण्याचे आवाहन मंदिराच्या विश्वस्तांनी केले आहे.
खंडेराव महाराज यात्रौत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 6:30 PM
चांदोरी : येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आराध्य दैवत खंडेराव महाराज यांचा शनिवारी (दि. २७) साजरा होणारा यात्रौत्सव कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याची माहिती खंडेराव महाराज मंदिर विश्वस्तांनी दिली. दरम्यान, या काळात मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
ठळक मुद्देचांदोरी : मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवणार