चांदवड : तालुक्यातील चिंचोले येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. चिंचोले येथे खंडेराव महाराजांची मोठी यात्रा भरते. यात्रोत्सव काळात विविध ठिकाणच्या वाघे-मुरळींचे जागरण गोंधळाचे कार्यक्रम होतात. सकाळी १० वाजता घटस्थापना करण्यात आली. यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी (दि. ६) काठी व रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता चिंचोलचे माजी सरपंच ज्ञानेश्वर भिकाजी जाधव यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे. रविारी (दि. ७) भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गोपीनाथ जाधव यांच्यातर्फे भंडारा देण्यात येणार आहे. रहाडी व लंगर तोडून यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.चांदवड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविक बारागाड्या पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी धोंडीराम जाधव, गोपाळ गायकवाड, मधुकर जाधव, सुधाकर जाधव, वाळू जाधव, तुकाराम जाधव, संदीप जाधव, भास्कार जाधव, रोहिदास जाधव, आत्माराम अहेर, तुकाराम जाधव, तान्हाजी जाधव, ज्ञानेश्वर भवर, अरुण जाधव, जयराम जाधव, नवनाथ अहेर आदी परिश्रम घेत आहेत.