त्र्यंबकेश्वर : येथे सालाबादप्रमाणे बांगरषष्टीनिमित्त खंडेराव महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त अडसरे परिवाराच्या वतीने देवाच्या काठीची गावातून मिरवणूत काढण्यात आली होती. पहाटेच्या सुमारास देवाच्या मूर्तीला मंगलस्नान घालण्यात आले. मुंबईचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पौरोहित्य सतीश दशपुत्रे यांनी केले. नगरपरिषदेचे बांधकाम सभापती दीपक लोणारी यांच्याकडून मंदिरात सत्यनारायण पूजन करण्यात आले.श्री निलांबिकादेवीच्या पायथ्याशी खंडेराव महाराजांचे मंदिर आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन असून, या मंदिराचा इतिहास सांगणे कठीण आहे. दरम्यान शहरातील कडलग मंडळी यांच्या पुढाकाराने गावातून, कडलग आळीतून लोकवर्गणी काढून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तेव्हापासून बांगरषष्ठी यात्रोत्सव कडलग आळीतील रहिवासीच करत आहेत.पूर्वी देवाची काठी नाचविण्याचा मान अडसरे, नाईकवाडी व मिंदे परिवाराकडे होता. कालपरत्वे मिंदे आणि नाईकवाडी घराणे काठी परंपरेत भाग घेत नसल्याने आज अडसरे कुटुंबाकडे हा मान आहे.रविवारी दुपारी अडसरे कुटुंबीयांतर्फे काठीची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी अडसरे परिवाराकडून भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.देवाची काठी उंच व वजनदारयावर्षी काठी नव्याने करण्यात आली. आज काठीवर नवा साज चढवून ध्वज उभारून काठीचे पूजन करण्यात आले. देवाची काठी उंच व वजनदार असते ती सहजासहजी एका माणसाकडून पेलवत नाही; मात्र पूर्वी दत्तोपंत अडसरे, बबन अडसरे, दामूअण्णा अडसरे, विनायक अडसरे हे बंधू एकएकटे काठी नाचवत.
खंडेराव महाराज यात्रा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:09 PM
त्र्यंबकेश्वर येथे सालाबादप्रमाणे बांगरषष्टीनिमित्त खंडेराव महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त अडसरे परिवाराच्या वतीने देवाच्या काठीची गावातून मिरवणूत काढण्यात आली होती.
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : देवीच्या काठीची सवाद्य मिरवणूक