ठळक मुद्देयावेळी खंडोबा मंदिर ते शनि मंदिरापर्यंत महिलांनी आकर्षक रांगोळी व रस्त्यावर सडा टाकून सुशोभित रस्ता केला. त्यावरून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म झाला.
अंदरसूल : येथे सालाबादप्रमाणे खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी यात्रोत्सव झाला. येथील मंदिरात सकाळी खंडेराव मंदिरात विधिवत पूजा व आरती करण्यात आली व संध्याकाळी सहा वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म झाला. गावातील स्त्री-पुरु ष, आबालवृद्धांनीही हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी गावातील व परिसरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती. खंडोबा महाराज व्यवस्था समितीचे युवा कार्यकर्ते व भक्तगण यांनी नियोजन केले होते.(14अंदरसुल खंडोबा)