खर्डे ; खर्डे ता देवळा येथे रॅपिड अँटीजन व आरटीपीआरच्या घेण्यात आलेल्या चाचणीत १४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खर्डेवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड सेंटरमध्ये जाऊन कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.देवळा शहर व तालुक्यात संचारबंदीमुळे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने रुग्ण संख्येत घट झाली आहे. तरी देखील काही गावांत प्रादुर्भाव कमी होतांना दिसत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडतो आहे.काही गावांत पॉझिटिव्ह रूग्ण मोकाट फिरत असून ते सुपर स्प्रेडर ठरत असल्याने याचा परिणाम वाढीव रुग्ण संख्येवर होत आहे. याला वेळीच आळा घालण्यासाठी गावागावात संस्थात्मक विलगिकरण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.खर्डे येथे अचानक रुग्ण संख्या वाढल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यात पॉझिटिव्ह रुग्ण देखिल दगावल्याने खळबळ उडाली आहे. रोगाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन ऍक्शन मोडवर आली असून, कुटुंबातील प्रत्येकाने आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केल्याने अनेकांना धडकी भरली आहे. रुग्ण संख्येत जरी घट होत असली तरी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील यामुळे गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
खर्डे ग्रामपंचायत प्रशासन ऍक्शन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:14 PM
खर्डे ; खर्डे ता देवळा येथे रॅपिड अँटीजन व आरटीपीआरच्या घेण्यात आलेल्या चाचणीत १४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खर्डेवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
ठळक मुद्देरुग्ण संख्येत वाढ होत असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर