मालेगाव : तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी आवश्यक निकषांची चाचणी महसूल व कृषी विभागाने सुरू केली आहे. तालुक्यातील १५ गावांमध्ये पथकांमार्फत महामदत अॅपद्वारे खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे.पावसाचे प्रमाण, गंभीर परिस्थिती व पीक सर्वेक्षण पाहणीतून समोर येणारी उत्पादन टक्केवारी यांचा एकत्रित अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासन आदेशानुसार पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी होत आहे.सत्यमापन चाचणीत प्रत्येक मंडळातील एका गावाचा समावेश आवश्यक असल्याने कृषी विभागाच्या तक्त्यानुसार सोयगाव, आघार बुद्रुक, सौंदाणे, टाकळी, जळगाव (निंबायती), मेहुणे, कळवाडी, गुगुळवाड, सायने बुद्रुक, अजंदे, घाणेगाव, टिंगरी, दहिदी, अजंग व रामपुरा या १५ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रत्येक गावात जाऊन पीक कापणी प्रयोग केला जात आहे. निवड झालेल्या गावातील मुख्य पिकांची कापणी करून उत्पादनात किती घट आली याची माहिती घेतली जात आहे. प्रत्येक गावातील सत्यमापन चाचणीसाठी एक याप्रमाणे १५ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तहसीलदार ज्योती देवरे, कृषी अधिकारी गोकुळ आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यमापन चाचणीचे काम सुरू आहे. तालुक्यात पावसाअभावी खरीप पिके जळूनखाक झाली आहेत. मक्याची वाढ खुंटली आहे. बाजरीत दाणा दिसत नाही. कपाशीचे पीक भुईसपाटझाले आहे.
खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 11:16 PM
मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी आवश्यक निकषांची चाचणी महसूल व कृषी विभागाने सुरू केली आहे. तालुक्यातील १५ गावांमध्ये पथकांमार्फत महामदत अॅपद्वारे खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे.
ठळक मुद्देकृषी विभाग : शासनाला अहवाल सादर करणार