येवला : तालुक्यातील राजापूर व पूर्व भागात दोन मिहने उलटले तरी देखील दमदार पावसाने हजेरी न लावलेल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहे. राजापूर व परिसरात पावसाळा संपत आला तरीही पावसाने डोळे लावल्याने खरीपाची पिके धोक्यात आली आहे. राजापूर परिसरात कपाशी,मका,बाजरी,भूई मग हि पिके घेतली जातात. पण पेरणी केलेल्या खरीपाची पिके हे रिमझिम पावसावर हिरवीगार झाली होती. परंतु पून्हा पावसाने डोळे लावलेल्याने मका पिके हे बिटया लागणार तर भाद्रपद महिना सूरवात झाला. अन उन्हाचे प्रमाण वाढल्याने मका वाळलेल्या अवस्थेत दिसून येत आहे व बाजरी हे पिक वाया जाण्याची चिन्हे आहे. पिंकाची दाणे भरण्यासाठी पावसाची गरज आहे. कपाशी वर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पावसाची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. परंतु वरूण राजा हा रूसल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. तसेच काही शेतकर्यानी विकत पाणी घेऊन पोळकांदयाचे रोप टाकलेली होती परंतु पाउस न आल्याने रोपे खराब होत चालली आहे. पावसाअभावी कांदे लागण खोळंबून पडली आहे. राजापूर येथे दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाली असल्याने पिण्यासाठी पाणी नाही गोरगरिबांना कामे नाही खरीपाची पेरणी हि फक्त सांगडे म्हणून शेतात उभे दिसत आहे. पाऊस होऊनी या पिकाना काही येणार नाही पेरणी साठी केलेला खर्चही वसूल होणार नाही या चिंतेने शेतकरी हवालिदल झाला आहे. राजापूर व परिसरात पिकाचे पंचनामे करून शेतकर्याना मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करित आहे.
पावसाअभावी खरीपाची पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 5:48 PM