शहरात घर, वाहने, सोने, दागदागिने खरेदी करून गुढीपाडवा साजरा केला जात असला तरी ग्रामीण भागात मात्र घरावर मांगल्याची गुढी उभारून भल्या पहाटे बळीराजा आपल्या सर्जा राजासोबत शेताची वाट धरत असतो. खरीप हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या मशागतीचा शुभारंभ शेतकरी पाडव्याच्या मुहूर्तावर करतात. शेतातील एका कोपऱ्यावर औताच्या पाच दहा मुडावणे (फेऱ्या) मारून शेतकरी घराकडे परततात. सुवासिनी पुरणपोळीसह सर्जा-राजासोबत घरधन्याची पूजा करतात. पुढच्या काळात पडणाऱ्या कडक ऊन्हापासून जनावरांचे संरक्षण व्हावे यासाठी बैलाच्या डोक्यावर थंडाव्याचे प्रतीक म्हणून कडुलिंबाचा पाला ठेवला जातो. सर्जा राजाला पुरणपोळीचा नैवेद्य सोबत वाडवडिलांना घास( नैवेद्य ) देण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात टिकून आहे.
--------------------
कोरोना जाऊदे, बळीराजा सुखी होऊ दे !
गत एक वर्षापासून थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले असून संपूर्ण जनतेला अन्नाचा पुरवठा करणाऱ्या बळीराजाला कोरोनाच्या संकटामुळे विविध आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हा कोरोना लवकर जाऊ दे आणि पुन्हा एकदा बळीराजा सुखी होऊ दे, असे मागणे या गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने केले आहे.
फोटो
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पारंपरिक गुढीपाडवा उत्सव साजरा करताना शेतकरी. (१३ पेठ १)
===Photopath===
130421\13nsk_8_13042021_13.jpg
===Caption===
१३ पेठ १