नाशिक : खरीप हंगाम सन २०१७ साठी जिल्ह्यातील कृषी निविष्ठाबाबतच्या नियोजनासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत विविध खते, बियाणे-किटकनाशके यांच्या नियोजनाची चर्चा झाली. येत्या खरीप हंगामासाठी दोन लाख ६५ हजार मेट्रिक टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविण्यात आल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या कार्यालयात अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप सन २०१७ च्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी अभिजित जमदाडे यांनी खरीप हंगाम सन २०१७ साठी जिल्ह्णात एकूण ८७ हजार ८४७ क्ंिवटल पीकनिहाय बियाणे, बी. टी. कापूस बियाण्यांची २,११,६७० इतकी पाकिटे तसेच दोन लाख ६५ हजार मेट्रिक टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविण्यात आली असल्याचे अभिजित जमदाडे यांनी सांगितले. बैठकीत जिल्ह्णात गुणवत्ता नियंत्रण कामकाजासाठी एकूण १६ भरारी पथके स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित केला असल्याचे स्पष्ट केले. बैठकीत इगतपुरी तालुक्यात भात बियाणे तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत खरीप हंगाम सन २०१७ च्या सुरुवातीस सर्व भात वाणांचे लॉटनिहाय व कंपनीनिहाय नमुने तपासूनच शेतकरी बांधवांना बियाणे उपलब्ध करून देऊ, असे अभिजित जमदाडे यांनी सांगितले. अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी यासंदर्भात सर्व किटकनाशके कंपनी प्रतिनिधी, बियाणे खत कंपनी प्रतिनिधी यांची तातडीची बैठक लावण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ए. एन. साठे तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी विजय धात्रक, बियाणे, खत कंपनीचे प्रतिनिधी, नाडाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
खरिपासाठी अडीच लाख मेट्रिक टन खतांची मागणी
By admin | Published: April 22, 2017 1:10 AM