सिन्नर : २0२0-२१ या वर्षासाठी कृषी विभागाने तालुक्यातील ६२ हजार ८४० हेक्टरवर खरीप पीक पेऱ्याचे नियोजन केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीन क्षेत्रात यंदा अडीच हजार हेक्टरवर घट होण्याची शक्यता आहे. तर मका बाजरीचे क्षेत्र वाढणार आहेपाऊस वेळेवर येईल असा अंदाज असल्याने नियोजन करण्यासाठी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शेतकºयांना विविध पिकांच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे मार्गदर्शनही केले जात आहे. शेतकºयांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. कोरोना संसर्गामुळे सर्वच क्षेत्रावर संकट आले आहे. शेतकºयांना खरिपाची तयारी करताना अडचण येऊ नये त्यासाठी कृषी विभागाकडून खते, बी-बियाणे बांधावर देण्याचे नियोजन केले आहे.बाजारात सोयाबीनचे पुरेसे बियाणे उपलब्धतेबाबत अडचणी असल्याचे कृषी विभागाकडून शेतकºयांना सांगण्यात येत आहे. त्यावर मात करण्यासाठी स्वत:कडील बियाणे वापरण्याचे आवाहन केले आहे. यंदा १३ हजार ९७० हेक्टर लागवड अपेक्षित आहे. मक्याच्या लागवडीवर दुष्परिणाम झाला होता. मक्या ऐवजी शेतकºयांनी बाजरी घेणे पसंत केले. ११हजार ९६१ हेक्टरवर मक्याची लागवड अपेक्षित आहे.अतिवृष्टीमुळे तूर, मूग, उडीद यांचे नुकसान झाले. त्यांचेही उत्पन्न कमी आले होते. कडधान्याचे दर टिकून राहावेत यासाठी कडधान्य लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. मुगाची गतवर्षी इतकीच ८८८ हेक्टरवर, ७९९ हेक्टरवर उडीद तर ४७१ हेक्टरवर तुरीची लागवड अपेक्षित आहे.
सिन्नर तालुक्यात ६२ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 10:05 PM
सिन्नर : २0२0-२१ या वर्षासाठी कृषी विभागाने तालुक्यातील ६२ हजार ८४० हेक्टरवर खरीप पीक पेऱ्याचे नियोजन केले आहे. गतवर्षीच्या ...
ठळक मुद्देसोयाबीनच्या लागवडीत घट : बाजरीचे क्षेत्र वाढणार, कडधान्यासाठी प्रोत्साहन