सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असून सकाळी कडक ऊन आणि दुपारनंतर पावसाच्या सरींचा वर्षाव असे दररोजचे झाले आहे. यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याचे बोलले जात आहे. सलग दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने विंधन विहिरी आणि काही विहिरीत पाणी आले आहे. अधूनमधून जोरदार वादळी वारे वाहत असले तरी खरिपाची जोरदार तयारी शेतकरी करताना सध्या दिसत आहेत. लवकरच मान्सूनचा पाऊस सुरू होईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे. सध्या शेतात खते पसरविणे, कचरा वेचणे आदींसह खरीप पूर्व कामे सुरू झाली आहेत. सध्या बियाण्यांच्या दुकानात मका, मुग, भुईमूग बियाणे खरेदी करताना शेतकरी दिसत आहेत.
मेशी परिसरात खरिपाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:11 AM