खमताणे : यावर्षी पावसाळ्यातील मृग नक्षत्र कोरडेठाक गेले असून, शनिवारपासून सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रातदेखील ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. सुरुवातीचे एक दोन पाऊस वगळता जून महिना कोरडाठाक जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.बियाणे, खते औषधे विक्र ेत्यांकडे देखील शांतता आहे. त्यामुळे बळीराजासह व्यापारी, शेतमजूर, नोकरदारवर्ग यांच्या नजरा वरुणराजाच्या आगमनाकडे लागून आहेत. मात्र खरीप हंगामासाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने या पावसाच्या आगमनाकडे बळीराजाच्या नजरा लागून आहेत. त्यानंतर पावसाने जी पाठ फिरवली ती अद्यापर्यंत कायम आहे. शुक्र वारी मृग नक्षत्र संपले आणि शनिवारी आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला. परंतु आर्द्रा नक्षत्राचेही पहिले दोन तीन दिवस कोरडेठाक गेले.आकाशात ढग दाटून येतात तोच वादळी वारा सुटून ढग कुठच्या कुठे वाहून जातात. परिणामी बळीराजाच्या आशेची निराशा होते. यावर्षी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी बळीराजाने शेतीची नांगरणी करून ठेवली आहे. परिणामी पाऊस पडल्यानंतर पेरणी पूर्व मशागत करून बियाणे पेरता येतील या आशेवर शेतकरी एक एक दिवस ढकलत आहेत. त्यातच दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत.साहजिकच विहिरींनीही हिवाळ्यात तळ गाठला. खरिपाचा हंगाम हा पावसावरच अवलंबून असल्याने बळीराजाच्या नजरा पावसाकडे लागून आहेत. खरिपाची पूर्वतयारी कशी करायचीकाही वर्षांपूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात वळीव हमखास बरसायचा. त्यामुळे मे महिन्यात तपमानही कमी असायचे. वळीव बरसला की शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पूर्वतयारी करता यायची त्यामुळे मुगाच्या पावसावर पेरण्याही उरकल्या जायच्या. मात्र काही वर्षापासून वातावरणातील बदलामुळे हे सारे चित्र पालटले आहे. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. वळीव न बसल्यामुळे खरिपाची पूर्वतयारी कशी करायची, या चिंतेत शेतकरी पडला आहे. त्यामुळे आता सगळा हवाला मान्सूनवरच आहे. याबाबत काहीच सांगता येत नसल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
पावसाअभावी खरीप हंगाम लांबणीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:31 AM
खमताणे : यावर्षी पावसाळ्यातील मृग नक्षत्र कोरडेठाक गेले असून, शनिवारपासून सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रातदेखील ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. सुरुवातीचे एक दोन पाऊस वगळता जून महिना कोरडाठाक जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.
ठळक मुद्देमृग नक्षत्र कोरडे : आर्द्रा नक्षत्राच्या पावसाकडे शेतकऱ्यांच्या नजरा