शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जाखोरीत खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:34 AM

शेतकऱ्यांची सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी पंधरवडा प्रचार व प्रसार कार्यक्रम रविवारी (दि.२६) राबविण्यात आला.

एकलहरे : शेतकऱ्यांची सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी पंधरवडा प्रचार व प्रसार कार्यक्रम रविवारी (दि.२६) राबविण्यात आला.उद््घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी विश्वास कळमकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक कृषी अधिकारी रणजित आंधळे, संतोष कापाळे, सीमा बोठे, जयश्री कुवर, अशोक धात्रक, कचरू कळमकर उपस्थित होते.नाशिक तालुका पूर्व भागातील जाखोरी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण व सोयाबीन शेतीशाळा कार्यक्र म राबविण्यात आला. रणजित आंधळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे, म्हणून कृषी विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. विविध योजना व त्यांची अंमलबजावणी कशी करावी याविषयी महिती दिली.सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती, माती नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक, बिजप्रक्रि या प्रात्यक्षिक, क्र ॉपसॅप विषयक माहिती, मक्यावर येणाºया अमेरिकन लष्करी अळीचा बिमोड, शेतकरी अपघात विमा, उन्हाळ्यात फळबागा वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनांंची माहिती देऊन, प्रत्येक शेतकºयाने प्रत्येक पिकाचा विमा काढण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर कांदाचाळ, यांत्रिकीकरण, शेततळे, गांडूळ व कंपोस्ट खत युनिटविषयी सहायक कृषी अधिकारी रणजित आंधळे, संतोष कापाळे, सीमा बोठे, जयश्री कुवर यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी अशोक धात्रक, कचरू कळमकर, कारभारी खाडेसर, सोपान जगळे, गणपत जाधव, कोंडाजी ताजणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी