नाशिक : अभिजात संगीताने अनेक चित्रपटांना अजरामर करणारे संगीतकार खय्याम यांच्या एकाहून एक सरस गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. खय्याम यांना या अजरामर गीतांद्वारे सुरेल स्वरांजली अर्पण करण्यात आली.कुसुमाग्रज स्मारकातील कार्यक्रमात गायिका मीना परुळकर-निकम, मिलिंद धटिंगण, संदीप थाटसिंगार यांनी सुमधुर आवाजातून सादर केले. ‘कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है, शाम ए गम की कसम, मै पल दो पल का शायर हू, मेरे घर आई एक नन्ही परी, चोरी चोरी कोई आए, ये मुलाकात इक बहाना है, ये क्या जगह है दोस्तो, दिखाई दिये यू, एै दिले नादान’ ही दशकानुदशके रसिकांच्या ओठावर असलेली गाणी सादर करण्यात आली. निवेदन श्रीपाद कोतवाल यांनी तर वादनात अमोल पाळेकर, अनील धुमाळ, अभिजीत वर्मा, नीलेश सोनवणे, सुवर्णा क्षीरसागर यांनी साथसंगत केली.
खय्याम यांच्या सदाबहार गीतांनी रंगली संध्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 1:37 AM