खेडलेझुंगे व रुई येथून शेकडो विद्यार्थी, नोकरवर्ग व शेतकरी दररोज ये-जा करीत असतात. या सर्व घटकांना रस्त्यांच्या दुरवस्थेचा फटका बसत आहे. त्यामुळे पायी चालणे, सायकल, मोटारसायकल किंवा पर्यायी वाहनाने प्रवास करणे अवघड झाले आहे. त्यामुळे परिसरात अपघाताचे प्रमाण वाढीस लागले असून रस्तेच मृत्युचे सापळे बनू पाहत आहेत. रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच एकाच वादळी पावसामुळे येथील रस्त्यांवरील खडी उघडी पडलेली आहे. त्यामुळे वाहने कशी चालवावीत असा प्रश्न येथील प्रवाशांच्या मनात उपस्थित होत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेकवेळा लेखी तक्रारी केल्या आहेत. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी तातडीने सदर रस्त्यांची दुरु स्ती करु न द्यावी अशी मागणी परिसरातील सरपंच, सदस्य व स्थानिक रहिवाशांनी केलेली आहे. खेडले ते रु ई दरम्यानचा रस्ता पूर्णत: उखडला असून रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. या रस्त्याबाबत वारंवार तक्र ारी करु नही प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्यांची तत्काळ दुरु स्ती अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
खेडलेझुंगे, रु ई परिसरातील रस्ते बनले मृत्यूचे सापळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 7:01 PM