खेडगाव : येथील तिसगाव परिसरात फळबाग लागवड परिसराचा लवकरच ग्रामीण पर्यटन विकास केंद्र म्हणून सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. येथील तिसगाव धरण परिसरातील खेडगाव ग्रामपालिकेच्या पडित जमिनीत २०२२ साली मनरेगा व आताची नरेगा योजना व ग्रामनिधीअंतर्गत ग्रामपालिकेने एकूण २० हजार फळझाडांची लागवड केली होती. त्याला सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे. मागील आठ दिवसांपूर्वी नाशिकजिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी नरेगाची काम पाहणी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांना प्रकल्पाची माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी (दि. १३) बनसोड यांनी फळबाग लागवड प्रकल्पाला भेट दिली. वणी -पिंपळगाव रस्त्यालगत असलेला हा प्रकल्प बनसोड यांनी पूर्ण ३५ एकर पायी फिरून माहिती घेतली. जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीकडे पडित जमीन असतील अशा पंचायतीचे सदस्य व ग्रामसेवक यांचा पाहणी दौरा आयोजित करून त्यांना पूर्ण प्रकल्प कसा उभा राहिला याचे मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. आता नवीन लागवड केलेल्या फणस, बोर, नारळ या फळझाडांनाही लवकरच फळधारणा सुरू होईल त्यातून परत ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले.एरवी ग्रामपंचायतच्या जागेवर होणारे अतिक्रमण टाळण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक शेखर गोऱ्हे व सर्व सरपंच व सदस्य यांनी संकल्पना उदयास आली आणि आज ग्रामपंचायतला वार्षिक सध्या पाचलाख रुपये उत्पन्न सुरू झाले आहे.पाच वर्षांसाठी लिलावn सरपंच शीतल धुळे, ज्येष्ठ सदस्य अनिल ठुबे व ग्रामविकास अधिकारी यांनी संपूर्ण प्रकल्पाची उभारणीपासून तर आतापर्यंतची माहिती दिली. नरेगा व ग्रामनिधीच्या माध्यमातून येथे एकूण २० हजार फळझाडांची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी आंबा, पेरू, चिकू या फळझाडांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून बहार येण्यास सुरुवात झाली आहे. पुढील पाच वर्षांसाठी एका खासगी व्यापाऱ्यास लागवड केलेल्या फळझाडे लिलाव पद्धतीनेसांभाळण्यास दिले आहेत.
खेडगावला लवकरच पर्यटन केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:32 AM
येथील तिसगाव परिसरात फळबाग लागवड परिसराचा लवकरच ग्रामीण पर्यटन विकास केंद्र म्हणून सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले.
ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासनाची संकल्पना