शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

नाशिक साखर कारखान्यातून ट्रकचालककासह एकाचे अपहरण 

By अझहर शेख | Published: December 04, 2023 6:36 PM

नाशिकरोड पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासचक्रे फिरवून ट्रकचालकाला शोधून काढले.

नाशिक : मागील आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून नाशिक साखर कारखाना येथून एका ट्रकसह चालक व ट्रक मालकाच्या भावाचे अपहरण केल्याची घटना घडली. नाशिकरोड पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासचक्रे फिरवून ट्रकचालकाला शोधून काढले; मात्र मालकाचा भावाचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील चिमणीबारव येथील युवराज पांडुरंग पोळ यांच्या मालकीचा ट्रकमधून (एमएच१२ एचडी ००९४) हा नाशिक साखर कारखान्यावर ऊसाची वाहतूक केली जाते. ट्रकचालक बाळासाहेब दिलीप बोहुडे व ट्रक मालक युवराज पोळ यांचा भाऊ अपहृत योगीराज पांडुरंग पोळ हे गेल्या २८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता इगतपुरी तालुक्यातील भरवीर साकुरफाटा येथून ट्रकमध्ये ऊस भरून नाशिक साखर कारखाना येथे उतरविण्यासाठी आले होते. सायंकाळपासून पाऊस पडत असल्याने ट्रकमधील उसाचा माल खाली करता येऊ शकला नव्हता. दुसऱ्या दिवशी २९नोव्हेंबरला दुपारी कारखाना सुरू झाल्यानंतर रात्री ट्रकमधील ऊस कारखान्यात खाली करून चालक बोहुडे व पोळ हे बाहेर ट्रकमध्ये डिझेल भरण्यासाठी गेले होते. त्यानंतर चालक व भावाचा कुठलाही संपर्क पोळ यांचा होत नव्हता. मध्यरात्री ट्रकचालक बाळासाहेब बोहुडे याच्यासोबत पोळ यांच्याशी संपर्क झाला होता.

 चौघांची टोळी; संगमेनरला सापडला ट्रकबोहुडे यांनी ट्रक मध्ये रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास डिझेल भरल्यानंतर त्यांचा ट्रक संशयित सुभाष बाळासाहेब खेमनर (रा. साकुर), शिवाजी कुदनर, पारानी कुदनर (दोघे रा. शिंदोडी, संगमनेर) व आणखीन एक साथीदार अशा चौघा जणांनी ट्रक रोखला. ‘तुमचा मागील आर्थिक व्यवहार बाकी आहे, आत्ताच्या आत्ता पैसे द्या...’ असे म्हणून ट्रकसह बोहुडे, पोळ यांचे अपहरण केले होते. पोलिसांनी हा ट्रक गजानन साखर कारखाना संगमनेर येथून ताब्यात घेतला. यानंतर चालक बाळासाहेब बोहुडे यांचा शोध लावला. मात्र योगीराज पोळ याचा शोध लागला नसल्याचे नाशिकरोड पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी