शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
3
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
4
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
5
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
6
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
7
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?
8
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
9
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
10
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
11
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
12
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
13
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
14
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
15
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
16
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
17
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
18
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
19
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
20
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा

अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहरण

By admin | Published: May 16, 2017 5:24 PM

गंगापूररोड परिसरातील चोपडा लॉन्स भागातून मोनाली गणेश पाटील या १४ वर्षाच्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गंगापूररोड परिसरातील चोपडा लॉन्स भागातून मोनाली गणेश पाटील या १४ वर्षाच्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीचे वडील गणेश वसंत पाटील यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित आकाश अनिल पातुडे याच्या विरोधात फिर्याद नोंदवली असून, पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अपहृत मोनाली रविवारी (दि.१४) रात्री ११ वाजेच्या सुमारास पाणी आणण्यास जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा परतलीच नाही. तिच्या पालकांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, मोनालीचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर तिच्या पालकांनी सोमवारी (दि. १५) सकाळी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत आरोपी आकाश पातुडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. मुलगी व आरोपी हे दोघेही मूळचे वडाळागावातील रहिवासी असून, मुलीचे वडील मेहबूबनगरमधील रहिवासी आहे. अपहृत मुलगी व तिचे पालक कामासाठी गंगापूर परिसरात आले असता ही घटना घडली. पोलीस मोनाली आणि आकाश यांचा तपास करीत आहेत.