शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

किकवी धरण  : सिंचन घोटाळ्याचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 1:09 AM

नाशिककरांच्या पाण्यावर अन्य जिल्ह्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांच्या निव्वळ पिण्याच्या पाण्यासाठी किकवी धरण बांधण्यास मान्यता देण्यात आली आणि २०२१ पासून या धरणातून नाशिक शहराला वाढीव पाणी देण्यास मान्यता देण्यात आली, मात्र सिंचन घोटाळ्यानंतर या धरणाच्या निविदा विद्यमान भाजपा सरकारने रद्द केल्या.

नाशिक : नाशिककरांच्या पाण्यावर अन्य जिल्ह्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांच्या निव्वळ पिण्याच्या पाण्यासाठी किकवी धरण बांधण्यास मान्यता देण्यात आली आणि २०२१ पासून या धरणातून नाशिक शहराला वाढीव पाणी देण्यास मान्यता देण्यात आली, मात्र सिंचन घोटाळ्यानंतर या धरणाच्या निविदा विद्यमान भाजपा सरकारने रद्द केल्या. त्यामुळे आता २०२१ पासून कसे काय पाणी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  नाशिक शहराच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने २००७ मध्ये गंगापूर धरणाला आणखी एका धरणातून पाणी मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत हे नियोजन केले. केंद्र सरकारच्या योजनेत नाशिकला वाढीव पाणीपुरवठ्यासाठी राज्य सरकारची हमी आवश्यक असल्याने त्यावेळी किकवी धरणातून पाणी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार २० आॅक्टोबर २००७ मध्ये मंजुरी देण्यात आली. सुरुवातीला हे धरण नाशिक महापालिकेने बांधण्याचे ठरविण्यात आले. परंतु नंतर महापालिकेने नकार दिला. त्यानंतर राज्य शासनाने हे धरण बांधण्याचे ठरविले. त्यासाठी निविदाही मागवल्या. परंतु नंतर सिंचन घोटाळा चर्चेत आला. पुढे राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर किकवी धरण बांधण्याच्या निविदाही रद्द करण्यात आल्या. परंतु त्याची पुुढील कार्यवाही सरकारने केलीच नाही. त्यामुळे आता राज्य सरकारनेच दिलेल्या मंजुरीनुसार नाशिक महापालिकेला २०२१ पासून या धरणातून ११६२ दशलक्ष घनफूट पाणी देणे बंधनकारक आहे, परंतु विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपत आला तरी धरणासाठी निविदा मागवल्या नाही की धरणाचे कामही सुरू झालेले नाही. दुसरीकडे पूर्वी फक्त अहमदनगरला पाणी देण्यावरून सुरू असलेल्या संघर्षाची मेंढीगिरी समितीमुळे व्याप्ती वाढली असून, मराठवाड्यासाठीदेखील पाणी द्यावे लागत असल्याने महापालिकाही चिंतेत आहे.बेत रहित : पालिकेकडे कोट्यवधींची मागणीमहापालिकेने धरण बांधण्याची तयारी केली तेव्हा मोठा गवगवा झाला होता. मात्र १८०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे हे धरण बांधण्यासाठी वनक्षेत्र बाधीत होणार असल्याने त्याची भरपाई द्यावी लागणार होती. तसेच धरण बांधण्यासाठी विलंब झाल्यास खर्चदेखील वाढणार होता. म्हणून महापालिकेने बेत रहित केला.महापालिकेने धरण बांधले नाही की धरणाचे पाणीही मिळाले नाही मात्र सिंचन क्षेत्र बाधीत होत असल्याने महापालिकेला भरपाईच्या नोटिसा मात्र दिल्या जात असून, कोट्यवधी रुपयांची मागणीही केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीDamधरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका