ठळक मुद्दे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात पाऊस सुरू असल्याने नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. फरशीपुलावरही खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचत असल्याने खड्डे समजून येत नसल्याने वाहने खड्ड्यात आपटून नुकसान होत आहे. वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.नांदूरशिंगोटे ते वावी हा संगमनेर, कोपरगावसाठी जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. परिसरातील शेतकरीआपला शेतमाल याच मार्गाने व्रिकीसाठी नेत असतात. पावसामुळे रस्त्याची वाट लागली आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नांदूरशिंगोटे, मानोरी, कनकोरी, निºहाळे, मºहळ, माळवाडी,वावी, सुरेगाव, फत्तेपूर भागातील प्रवासीवर्गाने केली आहे.