ओझर : नाशिक नंतर झपाट्याने विकसित होत असलेल्या ओझरच्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार किरण देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.बुधवारी (दि.३०) सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी तसे नियुक्तीचे आदेश काढले. ओझर नगरपरिषद अंमलात आल्यानंतर दिलीप मेनकर यांची नियुक्ती झाली होती. परंतु काही नागरिकांनी याचिका दाखल केल्यानंतर मेनकर यांची इतरत्र बदली झाली. मधल्या काळात निफाडच्या तहसीलदारांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले. एकूण रोजच्या उद्भवणाऱ्या समस्या व होणारी आंदोलने बघता जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी प्रशासन विभाग सांभाळणारे देशमुख यांच्याकडे ओझरचा अतिरिक्त कार्यभार दिल्याने ओझरकर नागरिकांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, मुख्याधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार सांभाळताना सगळ्यांना एकत्र घेऊन काम केले जाईल. नियमांच्या चौकटीतील असलेले लोकाभिमुख निर्णय घेतले जातील. मूलभूत समस्यामुक्ती विशेष प्रयत्न राहतील, असे देशमुख यांनी सांगितले.
ओझर नगरपरिषद मुख्याधिकारीपदी किरण देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 22:41 IST
ओझर : नाशिक नंतर झपाट्याने विकसित होत असलेल्या ओझरच्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार किरण देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
ओझर नगरपरिषद मुख्याधिकारीपदी किरण देशमुख
ठळक मुद्दे जिल्हाधिकारी यांनी नियुक्तीचे आदेश काढले.