शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

किसान पार्सल एक्स्प्रेसने ५० टन शेतमाल रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 1:14 AM

किसान पार्सल एक्स्प्रेसमुळे आता महाराष्टÑातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळून त्यांची प्रगती होण्यास मदत होईल. एका अर्थाने किसान पार्सल एक्स्प्रेस शेतकºयांसाठी रामबाण ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले. देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसला आॅनलाइन हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी तोमर बोलत होते. पहिल्याच दिवशी या एक्सप्रेसने ५० टन शेतमाल रवाना झाला असून, त्यामुळे रेल्वेला सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

ठळक मुद्देतोमर यांनी केले उद्घाटन : पहिल्या किसान एक्सप्रेसला प्रारंभ

नाशिक : किसान पार्सल एक्स्प्रेसमुळे आता महाराष्टÑातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळून त्यांची प्रगती होण्यास मदत होईल. एका अर्थाने किसान पार्सल एक्स्प्रेस शेतकºयांसाठी रामबाण ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले. देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसला आॅनलाइन हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी तोमर बोलत होते. पहिल्याच दिवशी या एक्सप्रेसने ५० टन शेतमाल रवाना झाला असून, त्यामुळे रेल्वेला सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.रेल्वे अर्थसंकल्पात शेतकºयांचा भाजीपाला आणि इतर नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी किसान एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार देवळाली कॅम्प ते दानापूर दरम्यान देशातील पहिली किसान पार्सल एक्स्प्रेस सुरू करण्यात आली असून, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आमदार सरोज आहेर आदी मान्यवर या कार्यक्रमास आॅनलाइन उपस्थित होते.याप्रसंगी तोमर म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात देशाचा विकास थांबला असला तरी शेतीक्षेत्र मात्र त्यापासून प्रभावित झाले नाही. शेतकºयांनी त्याची झळ पोहोचू दिली नाही त्यामुळे देशात कोठेही अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार रेल्वे मंत्रालयाने आजपासून किसान पार्सल एक्स्प्रेस सुरू केली असून, ही गाडी शेतकºयांसाठी खूपच लाभदायी ठरणार आहे. अत्यंत कमी दरात शेतकºयांना आपला माल परराज्यांत पाठविता येणार असल्याचे ते म्हणाले.राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्हा कृषीसाठी महत्त्वाचा जिल्हा असून, देशातील पहिली रेल्वे नाशिकमधून सुरू होत आहे. नाशिकची निवड ही सार्थ निवड असून, किसान रेल्वेच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळून फायदा जिल्ह्णातील शेतकºयांना होईल. गाडीला फुलांच्या माळा लावून सजविण्यात आले होते. कृषिमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सकाळी ११ वाजून ०५ मिनिटांनी किसान एक्स्प्रेस रवाना झाली.रेल्वेला मिळाले १.९६ लाखांचे उत्पन्नमध्य रेल्वेने सुरू केलेल्या देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसला पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिकरोड आणि मनमाड या रेल्वेस्थानकावरून ४९.१५ टन शेतीमाल दानापूरकडे रवाना करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली. शुक्रवारी पहिल्या दिवशी देवळाली स्थानकातून एकही पार्सल नसल्याने येथून गाडी मोकळीच रवाना झाली. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून २२.६४ टन, तर मनमाड रेल्वेस्थानकातून २६.५२ टन असा एकूण ४९.१५ टन शेतमाल या गाडीतून रवाना करण्यात आला. या माध्यमातून रेल्वेला एक लाख ९६ हजार २०७ रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे