ठळक मुद्देकोविड-१९ चाचणी व रुग्णांवर मोफत उपचार करावेत,
नाशिक : कामगार, शेतकरी, शेतमजूर व श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी शहरात सिटू, किसान सभा, शेतमजूर युनियन व जनसंघटनेच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले.कोविड-१९ चाचणी व रुग्णांवर मोफत उपचार करावेत, गरजूंना मोफत रेशन मिळावे, मनरेगामार्फत कामे मिळवीत, बेरोजगारांना १० हजार बेरोजगारी भत्ता मिळावा, शेतकरीविरोधी अध्यादेश मागे घेण्यात यावे, वेतनकपात, कामगार कपातीवर बंदी घालावी, सार्वजनिक उद्योग व सेवांचे खासगीकरण, विक्री रद्द करण्यात यावी, नवे शैक्षणिक धोरण मागे घ्यावे, वीजबिल माफ करावे यासह विविध मागण्यांसाठी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, भिवाजी भावले, कल्पना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.