पेठ - केंद्र शासनाच्या श्रमिक विरोधी व भांडवलशाही धोरणांचा निषेध, पेठ तालुका दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी पेठ तालुका किसान सभेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.माजी आमदार कॉ.जे.पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली रानदेवी मंदिर पटगाणापासून निघालेला मोर्चा जोगमोडी रोड, जूना बस स्टँन्ड,बलसाड रोड मार्गे जून्या तहसील कार्यालयासमोर येउन धडकला. मोर्चेक?्यांनी हातात लालबावटा घेत घोषणा दिल्या. यावेळी कॉ. जे.पी. गावीत यांनी मोर्चाला संबोधित करतांना केंद्र शासनाच्या श्रमीक, कामगार, कष्टकरी विरोधी धोरणांचा निषेध करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. याप्रसंगी माजी आमदार कॉ. जे.पी. गावीत, उपसभापती कॉ. इंद्रजीत गावीत, किसान सभेचे अध्यक्ष कॉ. देवराम गायकवाड, सेक्रेटरी कॉ. नामदेव मोहांडकर, कॉ. महेश टोपले, अॅड. दत्तू पाडवी, कॉ. जावेद शेख, कॉ. दुर्गा चौधरी, मुरलीधर निबेंकर, एकनाथ ब्राम्हणे, रामदास जाधव, छबीलदास आवारी, तुकाराम गवळी, विजय राथड, गंगाराम इंपाळ यांचे सह तालुक्यातील माकपा व किसान सभेचे सदस्य, शेतकरी उपस्थित होते.या आहेत मागण्या ...वनाधिकार दावे मंजूर करावेत, कोरोना काळात शासकिय धान्य मोफत वितरीत करावे, शेतकरी व कामगार विरोधी वटहुकूम मागे घ्यावेत,जूनाट शिधापत्रिका बदलून नवीन द्याव्यात, मनरेगात वर्षातून किमान 200 दिवस काम व प्रतिदिन 600 रूपये मजूरी मिळावी, आदिवासी तालुक्यात आॅनलाईन शिक्षणाची सक्ती करू नये, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करावी, निराधार व्यक्तींना प्रतिमाह 2500 रूपये पेन्शन मिळावी, पेठ तालुका दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतक?्यांना सरसकट भरपाई मिळावी, पीएम किसान योजनेचा तात्काळ लाभ मिळावा, कोरोना काळात दिलेली वाढीव वीज बीले माफ करावेत, प्लॉट धारकांची जीपीएस मोजणी करून नवीन सातबारा मिळावा, बँकामधील व्यवहार सुरळीत करून ग्राहकांना योग्य सेवा मिळावी. अपूर्ण व खराब रस्त्यांची दुरुस्ती करावी.