मालेगाव : विविध मागण्यांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदनमालेगाव : वनजमिनी आदिवासींच्या नावे कराव्यात, नवीन शिधापत्रिका देण्यात याव्यात, आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, जातीच्या दाखल्यांचे वाटप करावे यांसह विविध मागण्यांप्रश्नी नाशिक जिल्हा किसान सभेच्या मालेगाव तालुका कमिटीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.पिढ्यान्पिढ्या वनजमिनी कसणाºया आदिवासींच्या नावावर वनजमिनी करण्यात याव्यात. वनजमिनींचे दावे तातडीने निकाली काढावेत. नवीन शिधापत्रिका द्याव्यात, आदिवासींवर वनविभागा-कडून केला जाणारा अन्याय दूर करावा यासह विविध मागण्यांप्रश्नी नाशिक जिल्हा किसान सभेने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चाला येथील एटीटी हायस्कूलपासून सुरुवात झाली. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मोसमपूल, कॅम्परोड, कॉलेजरोडमार्गे प्रांत कार्यालयावर धडकला. यावेळी प्रांत अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात सावळीराम पवार, सुनील मालुसरे, हनुमंत गुंजाळ, धर्मराज शिंदे, शब्बीर सय्यद, गणपत गुंजाळ, शफी अहमद, अर्जुन ठाकरे, राजाराम अहिरे, मधुकर सोनवणे आदींसह आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
किसान सभेचा प्रांत कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 5:53 PM
मालेगाव : विविध मागण्यांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदनमालेगाव : वनजमिनी आदिवासींच्या नावे कराव्यात, नवीन शिधापत्रिका देण्यात याव्यात, आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, जातीच्या दाखल्यांचे वाटप करावे यांसह विविध मागण्यांप्रश्नी नाशिक जिल्हा किसान सभेच्या मालेगाव तालुका कमिटीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात ...
ठळक मुद्देपिढ्यान्पिढ्या वनजमिनी कसणाºया आदिवासींच्या नावावर वनजमिनी करण्यात याव्यात