नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत १५व्या फेरी अखेर शिवसेनापुरस्कृत किशोर दराडे यांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करीत टीडीफ व काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्यावर विजय मिळविला. भाजपाचे अनिकेत पाटील तिसºया क्रमांकावर फेकले गेले. दराडे यांना २४ हजार ३६९ मते मिळाली. बेडसे यांना १३ हजार ८३० मते पडली.पहिल्या पसंतीची मते मोजल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला कोटा पूर्ण करता न आल्याने इलिमिनेशन राउण्ड घेण्यात आला. प्रथम तळाच्या तीन उमेदवारांना मिळालेली दुसºया पसंतीची मते मोजण्यात आली. ही प्रक्रीया १५ व्या फेरीपर्यंत चालली.या निवडणुकीने नवीन इतिहास रचला गेला आहे. येवल्यातील दराडे कुटुंबीयांमध्ये महिन्याभरात दोन आमदार विधान परिषदेत दाखल झाले आहेत़ गेल्या महिन्यात नाशिक स्थानिक संस्था मतदारसंघातून किशोर दराडे यांचे ज्येष्ठ बंधू नरेंद्र दराडे शिवसेनेकडून पहिल्या फेरीत निवडून आले होते. राष्ट्रवादी, भाजपाचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा त्यांनी पराभव केल्यामुळे राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपाला सहाणे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसचे माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव अनिकेत यांचा भाजपात प्रवेश करून उमेदवारी जाहीर केली व विजयासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. परंतु दराडे यांच्या आघाडीमुळे पुन्हा एकदा टीडीएफमध्ये फाटाफुटीच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली असून, मतदारसंघ ताब्यात घेण्याचे भाजपाचे प्रयत्न फसले आहेत. शिक्षक मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी यानिमित्ताने नाशिक जिल्ह्णाला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे़ सोमवारी झालेल्या मतदानात नाशिक विभागातील ९२.३२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे नाशिक विभागाचे लक्ष लागून होते. सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रकियेला सुरुवात झाली असली तरी, मतपत्रिकेचे वर्गीकरण, त्याची खातरजमा करणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी तब्बल दहा तासांचा कालावधी लागला़ प्रत्यक्ष मतमोजणीस संध्याकाळी सात वाजता सुरुवात झाली. या निवडणुकीच्या मतमोजणीत ४० हजार मतपत्रिकांची तपासणी करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला दहा तासांचा कालावधी लागला, त्यात पहिल्या २० हजार मतपत्रिकेत किशोर दराडे यांना सात हजार ९२४ बेडसे यांना ३ हजार ४२७, भाऊसाहेब कचरे यांना दोन हजार ८७८ व अनिकेत पाटील यांना एक हजार ९४६ मते मिळाल्याचे दिसून आले. सुमारे ६३३ मते बाद झाले, तर दुसºया २० हजार मतपत्रिकेचे तपासणीत दराडे यांना एकूण १३ हजार ९५७, बेडसे यांना आठ हजार २३२ अनिकेत पाटील यांना चार हजार ७९२, तर कचरे यांना चार हजार ७५३ मते दिसून आली. एकूण ४० हजार मतांच्या तपासणीत ३८ हजार ५८४ मते वैद्य ठरली, तर एक हजार ३४१ मते बाद झाली. ७२ मतदारांनी नोटाचा वापर केला. सायंकाळी ७ वाजता ४९ हजार ७६९ मतांची मोजणी पूर्ण होऊन निवडणूक अधिकाºयांनी उमेदवार निहाय पहिल्या पसंतीची मते जाहीर केली. त्यात १०३ मतदारांनी नोटाचा वापर केला, तर एक हजार ६८७ मते बाद झाली. त्यामुळे एकूण ४७ हजार ९७८ मते वैद्य ठरल्याने २३ हजार ९९० मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. एकाही उमेदवाराला पहिल्या पसंतीचे २३ हजार ९९० मते न मिळाल्याने सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारांची दुसºया पसंतीची मते मोजण्यास सुरुवात करण्यात आली. त्यात पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये किशोर दराडे यांना १६ हजार ८८६ मते, बेडसे यांना दहा हजार ९७०, अनिकेत पाटील यांना सहा हजार ३२९, शाळीग्राम भिरुड यांना तीन हजार ८७६, भाऊसाहेब कचरे यांना पाच हजार १६७ तर प्रताप सोनवणे यांना ५०७ मते मिळाली. रात्री साडेनऊ वाजता कमी मते मिळालेल्या उमेदवारांना इलिमेट करून त्यांच्या मतपत्रिकेवर दुसºया क्रमांकाची मिळालेली मते अन्य उमेदवारांच्या खात्यात वर्ग करण्यात आली़ इलिमेट केलेल्या अशोक पाटील, महादेव चव्हाण, अजित दिवटे व विठ्ठल पानसरे या चौघांची दुसºया क्रमांकाची मते मोजण्यात आली. त्यात दराडे यांची २६ मते, तर बेडसे यांची सहा मते वाढली त्यामुळे दराडे यांना १६ हजार ९१२ तर बेडसे यांना १० हजार ९७६ मते मिळाली आहेत. विधान परिषदेच्या या निवडणुकीत शिक्षकांनी आपला प्रतिनिधी पसंतीक्रम देऊन निवडायचा असल्याचा प्रचार उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून केला गेला. पसंतीक्रमाने मतदान कसे करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात मतपत्रिकांची तपासणी करताना, शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात मते बाद केल्याचे उघड झाले आहे. अनेकांनी मतपत्रिकेत चुकीचे क्रमांक नोंदविले, पसंती क्रम देताना सर्वच उमेदवारांना एक क्रमांक देण्यात धन्यता मानली, तर अनेकांनी मते देतांना त्यावर विशिष्ट प्रकारच्या खुणा केल्या, काहींनी सर्वच उमेदवारांना पसंती क्रम दिल्यामुळे सुमारे एक हजार ३०० मते बाद ठरविण्यात आली़कार्यकर्त्यांचा जल्लोषदराडे यांच्या विजयाचे वृत्त समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी एकच जल्लोष केला. पहाटेपर्यंत शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते तेथे तळ ठोकून होते. १५ व्या फेरीतील मतमोजणीच्या आकडेवारीनुसार किशोर दराडे यांनी २४ हजार ३६९ तर संदीप बेडसे यांनी १३ हजार ८३० मते मिळाली. १३४१ मते बाद ठरली. तर १०३ मतदारांनी नोटा या पर्यायाचा वापर केलेला दिसून आला.
शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी नाशिक : राष्ट्रवादी पुरस्कृत बेडसे दुसऱ्या स्थानी; विजयासाठीचा कोटा पूर्ण न झाल्याने ‘इलिमिनेशन राउण्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 4:17 AM
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत १५व्या फेरी अखेर शिवसेनापुरस्कृत किशोर दराडे यांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करीत टीडीफ व काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्यावर विजय मिळविला. भाजपाचे अनिकेत पाटील तिसºया क्रमांकावर फेकले गेले. दराडे यांना २४ हजार ३६९ मते मिळाली. बेडसे यांना १३ हजार ८३० मते पडली.
ठळक मुद्देभाजपाचे अनिकेत पाटील तिसºया क्रमांकावरदराडे यांना २४ हजार ३६९ मते मिळालीबेडसे यांना १३ हजार ८३० मते पडली