नाशिक:मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवारी आयोजित केलेल्या सहाव्या राष्ट्रीय व अकराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे विजेतेपद बुलढाण्याच्या किशोर गव्हाणे याने पटकावले. कडाक्याच्या थंडीत पहाटे पावणे सहापासून स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्याच्या थंडीतही धावपटूंचा उत्साह कायम होता. सतरा गटात झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ज्येष्ठ धावपटूंनी सहभाग नोंदविला.पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावतांना बुलढाणा (महाराष्ट्र) चा धावपटू किशोर गव्हाणे याने २ तास २६.३१ मिनीटे अशी वेळ नोंदवत अव्वल क्र मांकासह मॅरेथॉनचे एक लाख रूपयांचे पारितोषिक पटकावले.स्पर्धेसाठी भारतातून उत्तरप्रदेश,राजस्थान,पंजाब,बिहार,हरियाणा,दिल्ली,तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धावपटू असे एकूण ३००० स्पर्धक सहभागी झाले होते.बक्षिस वितरण समारंभ रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाला, यावेळी मॅरेथॉन आयोजन समिती अध्यक्षा व संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमा पवार यांनी यावेळी बोलतांना मविप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या यशिस्वतेसाठी अत्यंत सुक्ष्म व काटेकोर नियोजन केलेले होते त्यासाठी एकूण कमिट्यांची नेमणूक करून स्पर्धा यशस्वी केल्याचे त्यांनी सांगितले तसेच इगतपुरी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी २१ कि.मी.मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम आला असून ग्रामीण भागातील विद्यार्थी व खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर नाव कमवावे हा स्पर्धेचा उद्देश सफल होत असल्याचे सांगतांना धावनंमार्ग मापनापासून ते स्पर्धा पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाने आपली जबाबदारी सक्षमपणे पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी आपल्या मनोगतात मॅरेथॉन स्पर्धा हि मनोबल वाढविणारी स्पर्धा असून मविप्र संस्थेने मेहनतीने,यशस्वी नियोजन करून स्पर्धेची उंची वाढवलेली आहे. तसेच प्रत्येक खेळाडूने मनात जिद्द ठेऊन प्रामाणकि प्रयत्नाने आयुष्याची वाटचाल केल्यास यश हमखास मिळते असे सांगून प्रत्येकाने आयुष्यात चॅलेंज स्वीकारून जीवनाची वाटचाल करावी.महिलांनी देखील नियमति व्यायाम करावा,एखादा छंद जोपासावा असे सांगत आयर्नमन स्पर्धेच्या प्रवास त्यांनी उपस्थितांसमोर उलगडून सांगितला.ललिता बाबर यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना यशस्वी खेळाडू होण्यासाठी प्रत्येकाने मनात जिद्द व चिकाटी ठेवावी.जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठे धेय्य ठरवा तसेच कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करायला शिका असे सांगतांना क्र ीडा क्षेत्रात मुलींची कामिगरी प्रभावी असून मुलींना चूल आण िमुल याच्या पलीकडे विचार करायला शिकवा,मुलींसाठी अवकाश मोकळे करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.तसेच मविप्र संस्थेने अतिशय शिस्तबद्धपणे स्पर्धेचे नियोजन केले असून नाशिक जिल्ह्यातून जास्तीत जास्त खेळाडू घडतील असे सांगत आपण २०२० मध्ये टोकियो येथे होणार्या स्पर्धेत सहभाग घेऊन भारतवासीयांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.अध्यक्षीय मनोगतात सभापती माणकिराव बोरस्ते यांनी कर्मवीरांनी शिक्षण गावागावात पोहचिवण्याचे काम केले.शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी डॉ.वसंत पवार यांनी मविप्र मॅरेथॉन स्पर्धा सुरु केल्याचे सांगून त्यातून चांगले खेळाडू घडतील असे सांगितले.यावेळी विविध १७ गटातील विजेत्यांसह सहभागी धावपटूंना स्पर्धा पूर्ण केल्यानंतर पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी एकूण७लाख२३हजार रु पयांची बिक्षसे देण्यात आली.यावेळी संस्थेतील सुलतान देशमुख,सपना माने,विनिता उगावकर,हुजेब पठाण, व पवन ढोंन्नर यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूं पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ..व्ही.बी.गायकवाड यांनी करून दिला. स्पर्धा निरीक्षक म्हणून राजन भाटीया व राजीव जोशी यांनी काम पिहले. सूत्रसंचलन अनिल उगले व क्र ीडाधिकारी प्रा.हेमंत पाटील यांनी केले. स्पर्धा यशस्वितेसाठी बाजीराव पेखळे, मीनाक्षी गवळी,लहानू कांदळकर,सुनील आहेर,बाळासाहेब शिंदे,के.पी.लवांड,सोपान जाधव,महेंद्र गायकवाड,डॉ.ज्ञानेश्वर गडाख,विक्र ांत राजोळे,राजेंद्र पोटे,मंगला शिंदे,निर्मला चौधरी,सुहास खर्डे यांनी प्रयत्न केले.
किशोर गव्हाणे ठरला नाशिक मविप्र मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचा विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 5:42 PM
नाशिक:मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवारी आयोजित केलेल्या सहाव्या राष्ट्रीय व अकराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे विजेतेपद बुलढाण्याच्या किशोर गव्हाणे याने पटकावले. कडाक्याच्या थंडीत पहाटे पावणे सहापासून स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्याच्या थंडीतही धावपटूंचा उत्साह कायम होता. सतरा गटात झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ज्येष्ठ धावपटूंनी सहभाग नोंदविला.
ठळक मुद्दे४२किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनने स्पर्धेची सुरवात झाली. आॅलिंम्पिकपटू ललिता बाबर, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार,अध्यक्ष डॉ .तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते ,चिटणीस डॉ.सुनील ढिकले,उपसभापती राघो नाना अहिरे, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षिका