नाशिक : गायक किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त ‘किशोर ही किशोर’ या गीतांच्या मैफलीस रसिक श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली.प. सा. नाट्यमंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक आॅर्केस्ट्रा असोसिएशनचे संस्थापक उमेश गायकवाड व ए. एन. कराओके क्लबचे संचालक नितीनकुमार चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण केला. क्लबचे नवोदित हौशी गायक जयेश वाघ, विजय माळी, मंगेश जानोरकर, रवींद्र काळे, बिपीन काजळे, संजय गाडे, रवींद्र सोनजे, संदीप कोते, राकेश चव्हाण, राजेश बागुल, राज ढगे यांसह द्वंद्वगीतांमध्ये स्मिता पाटील- घाटे, रिया बागुल, महिमा, अनिता खर्डे, अंजली चव्हाण, मेघा सोनवणे यांनी किशोरकुमार यांची विविध लोकप्रिय गाणी सादर केली. अमर भोळे यांच्या निवेदनाने मैफलीत रंगत आणली.या मैफलीत नवोदित हौशी गायक राजेश बागुल यांनी किनारा चित्रपटातील ‘जाने क्या सोचा’ या गीताने प्रारंभ केला. त्यानंतर ‘चांदनी रात में एक बार तुझे’, ‘ तेरे बिना जिंदगिसे कोई’, ‘सारा जमाना’, ‘मंजिले अपनी जगाह’ अशी एकापेक्षा एक सुपर हिट गिते सादर केली.
‘किशोर ही किशोर’ गीतांची मैफल रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:55 AM