नाशिक : पेठ येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास लायन्स क्लब आॅफ नाशिक व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वयंपाकाची भांडी व भोजन वाढण्याचे साहित्य मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे सुपूर्द केले. काल (दि.२६) लायन्स क्लबच्या वतीने पेठ तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास आवश्यक असलेले भोेजनाचे १०० संच भेट दिले. त्यात ताटे, वाट्या, चमचे आदिंचा समावेश होता. तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदराव पगार यांनी भोजन बनविण्याकरिता आवश्यक असलेले दोन मोठे पातेले, दांडीचे पातेले, वगराळे व भाताळे भेट दिले. तसेच इगतपुरी येथील प्राथमिक शिक्षक उमेश बैरागी यांनीही या बालिका विद्यालयास भोजन वाढण्याचे साहित्य दोन संच परात व टोप भेट दिले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, लायन्स क्लबचे वैद्य विक्रांत जाधव, जयंत येवला, सुनील पाटील, राजेश कोठावदे, राजीव व्यास, रोहयो गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सुनील दराडे, मोहंमद इमरान आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
कस्तुरबा गांधी विद्यालयास स्वयंपाकाची भांडी भेट
By admin | Published: May 27, 2015 12:31 AM