नाशिक : के.के. वाघ शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांची कोविड केअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून २५ ते २९ मे या कालावधीत कोरोना, म्युकरमायकोसिस आरोग्य आदी विषयांवर ऑनलाइन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कोविड केअर कमिटीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात ऑनलाइन वेबिनारमध्ये ‘कोविड-१९ आणि इम्युनिटी’ या विषयावर डॉ. अविनाश सावजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी कोविड-१९ काळात आवश्यक असलेली इम्युनिटी, इम्युनिटीचे प्रकार, इम्युनिटीचे काम याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे डॉ. आत्माराम पवार यांनी ‘औषधे घ्यावे बघून’ विषयावर बोलताना औषधांचे प्रकार-१ प्रेसक्राइबड प्रग्ज, नॉन -प्रेसक्राइबड प्रग्ज याबाबत माहिती दिली, तसेच प्रिस्क्रिप्शनचे महत्त्व, प्रिस्क्रिप्शन लिहिण्यापासून, तर त्यांचे डॉक्युमेंटेशनपर्यंतचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. मेडिसिन बिल व त्याचे फायदे तोटे, जेनेरिक मेडिसिन, ऑनलाइन फार्मसी, ओ.टी.सी.बाबतची माहिती दिली. पेनकिलर, अँटिबायोटिक औषधांचे शरीरावर होणारे दुष्परिणामही त्यांनी आपल्या व्याख्यानातून समजावून सांगितले, तर डॉ. मयूर लांडे यांनी ‘म्युकरमायकोसिस’ अर्थात काळी बुरशी या विषयावर मार्गदर्शन केले. जयश्री धांडे यांनी ‘सार्स कॉव्ह-२ : इन्फेकशन पॅथोजेनेसीस अँड इंम्युन रिस्पॉन्स’ या विषयावर मार्गदर्शन केले.