लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बारावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील करिअर निवडण्यासाठी महत्त्वाची ठरणारी ‘निट’च्या दुसऱ्या सत्राची परीक्षा रविवारी (दि. १३) रोजी जिल्'ातील ४४ परीक्षा केंद्रांवर होत असून, या परीक्षेसाठी जिल्'ातून वीस हजारांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत. कोरोनाच्या संक्रमणाचा काळ पाहता, संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून परीक्षा केंद्रांवर खबरदारीच्या सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी येणाºया प्रत्येक विद्यार्थ्यांना शासनाकडून पेन व मास्क पुरविण्यात येणार आहे.या परीक्षेच्या पूर्वसंध्येला शनिवारी सर्वच परीक्षा केंद्रांच्या वर्गखोल्यांमध्ये सॅनिटायझिंग करण्याचे काम करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक टाकण्याचे कामही पर्यवेक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले. दुपारी दोन ते पाच या कालावधीत होणाºया या परीक्षेसाठी एका वर्गात फक्तबारा परीक्षार्थींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक सहा फुटावर एक बेंच ठेवण्यात आला असून, प्रत्येक परीक्षार्थींना परीक्षेपूर्वी एक तास अगोदर म्हणजे दुपारी १ वाजता परीक्षा केंद्राच्या आवारात सोडण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची धातुशोधक यंत्राद्वारे तपासणी केली जाईल त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मल मीटरने तापमान तपासण्यात येणार आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची एकाच वेळी स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. एका वर्गात दोन पर्यवेक्षक असतील, त्यांच्याही आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्याच्या शासनाच्या सूचना असल्याने त्यांना हॅण्डग्लोज, मास्क तसेच २५० ग्रॅम सॅनिटायझरची बाटली देण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करतेवेळी शासनाकडून विद्यार्थ्यांना पेन, मास्क दिला जाईल, त्याचबरोबर त्यांचे हॅण्ड सॅनिटायझिंग करण्यात येतील. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणाºया पालकांना मात्र प्रवेशद्वारातच अडविण्यात येणार असून, पर्यवेक्षक व परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांना डिस्पोजल नास्ता देण्यात येणार आहे.अशा विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा‘निट’ची परीक्षा देऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती कोरोनाग्रस्त असेल व त्याने तशी कल्पना दिली तर किंवा परीक्षा केंद्रावर तपासणी करताना विद्यार्थ्यांचे तापमान वाढलेले दिसल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी ‘आयसोलेशन’सेंटर परीक्षा केंद्रावर तयार ठेवण्यात आले असून, अशा विद्यार्थ्यांवर देखरेखीसाठी दोन पर्यवेक्षक ठेवण्यात येतील. या पर्यवेक्षकांना फेसशिल्ड, हॅण्डग्लोज आदी साहित्य पुरविण्यात येणार आहे.* कोरोनाचा संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांसाठीही शासनाने पर्याय ठेवला असून, त्यासाठी ‘नीट’ने लिंक दिलेली आहे. विद्यार्थ्याने स्वत:च या लिंकवर जाऊन आपली सर्वतोपरी माहिती भरल्यास शासनाकडून त्याची परीक्षा नंतर घेण्याबाबत सूचित केले जाईल व त्यासाठी स्वतंत्र वेळ व दिनांक देण्यात येणार आहे.