नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने व नाशिककरांच्या सुरक्षेसाठी विविध तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये होणाºया भाडेतत्त्वाच्या व्यवहाराची माहिती संबंधितांनी पोलीस ठाण्यात जाऊन द्यावी, यासाठी मुद्रांक करारपत्राची अट शिथिल करण्यात येऊन भाडेकरूंची पोलीस ठाणेनिहाय नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. सातपूर परिसरात दहशतवादी बिलाल ऊर्फ लालबाबा काही वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर राहात असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर भाडेतत्त्वाच्या व्यवहाराची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले; मात्र दरम्यानच्या कालावधीत शहरातील विविध उपनगरीय भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भाडेतत्त्वावर घरे देण्या-घेण्यासंबंधी व्यवहार वाढले असतानाही पोलीस ठाण्यात मात्र त्या तुलनेत नोंदणीची संख्या अत्यल्प असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. काही दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा परिसरातील ‘पार्वती’च्या सदनिकेत अहमदनगरचे कुख्यात गुंड शार्पशूटर वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी उघड केले. तब्बल १८ महिन्यांपासून त्यांचे या भागात वास्तव्य होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या गुंडांना ज्या घरमालकाने भाडेतत्त्वावर घर दिले त्याने कुठलीही माहिती यासंदर्भात पोलिसांना दिलेली नव्हती. यामुळे पोलिसांनी त्याच्यासह एजंटवरही गुन्हा दाखल केला आहे. एकूणच या घटनेपासून पुन्हा शहरात अनधिकृतपणे वास्तव्य करणाºया भाडेकरूं चा प्रश्न व शहराच्या सुरक्षाव्यवस्थेला उद्भवणारा धोका याविषयीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.शहरात ४ हजार भाडेकरूशहर व परिसरात ४ हजार २९२ भाडेकरू अधिकृतपणे वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. सर्वात कमी भाडेकरू देवळाली कॅम्प परिसरात असून, सर्वाधिक भाडेकरू इंदिरानगर परिसरात आहे. तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत भाडेकरूंची नोंद काही प्रमाणात करण्यात आली असून, जानेवारीपासून तर अद्याप शहर व उपनगरीय भागात एकूण ४ हजार २९२ भाडेकरू अधिकृतपणे वास्तव्य करीत आहेत.नोंदणी सुलभतेच्या दिशेने पाऊलपोलीस प्रशासनानेदेखील सदर प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाडेतत्त्वाची पोलीस ठाण्यातील नोंदणीप्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकले आहे. भाडेतत्त्वाच्या मुद्रांक करारपत्राच्या नोंदणीकरिता असलेली अट शिथिल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली आहे. करारपत्राचा खर्च करण्याची जबाबदारी घरमालकाची की भाडेकरूंची यावरून होणारा वाद व त्यामुळे पोलिसांकडे नोंदणीबाबत केली जाणारी टाळाटाळ लक्षात घेता सिंगल यांनी सदर अट शिथिल करून सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांना तशी लेखी सूचनाही काढली आहे. यामुळे नोंदणीच्या आकडेवारीमध्ये नजीकच्या काळात वाढ हाईल, असा विश्वास पोलिसांना आहे.सर्वाधिक भाडेकरू इंदिरानगरमध्ये४शहरातील तेरा पोलीस ठाण्यांपैकी सर्वाधिक भाडेकरू इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. इंदिरानगरमध्ये एकूण ८३८ भाडेकरूंची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. इंदिरानगरच्या हद्दीत असलेल्या पाथर्डी, पांडवनगरी, वडाळागाव, राजीवनगर आदी भागात मोठ्या संख्येने घरे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असून, भाडेतत्त्वावर घरे घेणाºयांची संख्या अधिक आहे. इंदिरानगरमध्ये संख्या अधिक असली तरी त्याच्या तुलनेत जास्त भाडेकरूंची संख्या अंबड व सातपूर भागात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात औद्योगिक वसाहत असल्यामुळे कामगार वर्ग मोठ्या संख्येने येथे वास्तव्यास असून, परप्रांतीय लोकांचीदेखील संख्या अधिक आहे. या भागातील पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांनीदेखील परिसरातील भाडेकरूंची माहिती मागवून त्याची नोंद करून घेण्यासाठी मोहीम सुरू करण्याची गरज आहे.
नाशिककरांच्या सुरक्षेसाठी भाडेकरू कळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:53 PM