नाशिक : मुलांच्या मनात चाललेले विचार आणि भावनांचे महाभारत जाणून घ्यायचे असेल तर ‘मुलांच्या मनात डोकावताना’ ही पुस्तकरूपी गीता प्रत्येक पालक आणि शिक्षकाने वाचायलाच हवी, असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडले.लेखिका डॉ. स्वाती गानू-टोकेकर यांच्या वैशाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘मुलांच्या मनात डोकावताना’ या अभ्यासपूर्ण पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून प्रा. जोशी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, कवी रवींद्र मालुंजकर, प्रकाशक विलास पोतदार, आरती कुलकर्णी उपस्थित होते.प्रा. जोशी म्हणाले की, मुलांसाठी आवर्जून केलेल्या लेखनाची दखल घेणे आवश्यक आहे. तसेच मुलांच्या मनातील नवनवीन कल्पना, प्रश्न, जिज्ञासा भावना आणि विचारांचा गोंधळ जाणून घेण्यासाठी आणि आपलं मूल समजून घेण्यासाठी हे पुस्तक अनेक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. श्रीविद्या प्रकाशनचे अवधूत जोशी, मुखपृष्ठकार अरविंद शेलार, चित्रपट निर्माते संदीप राक्षे, राजेंद्र पोतदार, सुभाष गादड आदी उपस्थित होते. विनय गानू, रोहिणी निनावे, शशांक निनावे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक शमा निनावे यांनी केले. नीला सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.
मुलांच्या मनातील विचार जाणून घ्या : जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:45 PM