नाशिक : बौद्धिक संपदा भारताला महासत्ता बनवू शकते. कौशल्याधिष्ठित ज्ञानामुळे समृद्ध होणे शक्य आहे. ज्ञानाच्या माध्यमातून आपण यशस्वी होऊ शकतो. ज्ञानाची अर्थसत्ताच आपल्याला महासत्तेच्या दिशेने नेण्यास प्रेरक ठरेल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. सुनील कुटे यांनी केले केले. धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व प्राथमिक शाळेत आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रकाश कोल्हे, ज्योती कोल्हे, डॉ. वसंत बर्वे, डॉ. अविनाश शिरोडे, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज आदी उपस्थित होते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे विचार बालवयापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याची गरज आहे, असेही प्रमुख पाहुण्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महासत्ता बनण्यासाठी ज्ञानाची अर्थसत्ता महत्त्वाची : सुनील कुटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:35 AM