सटाणा : संविधान हा भारतीयांचा आत्मा आहे. वर्तमान युग कायद्याचे आहे. जसा कायदा बदलतो तसा समाज बदलतो तशी कालानुरूप साक्षरतेची व्याख्याही बदलत आहे. भविष्यात ज्याला कायद्याचे ज्ञान नसेल तो निरक्षर समजला जाईल, असे प्रतिपादन सटाणा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश ए. व्ही. आव्हाड यांनी व्यक्त केले.नामपूर येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या कार्यक्रमात ‘संविधान जनजागृती’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे होते. प्राध्यापक प्रबोधिनी आणि तालुका विधि सेवा समिती व सटाणा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मुंबई उच्च न्यायालयाचे वकील प्रसाद परब यांनी, संविधानातील तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांमुळे वेळोवेळी घटनेत झालेले बदल यावर मार्गदर्शन केले. सटाणा येथील वकील ए. एल. पाटील यांनी, संविधानामुळे भारतला नवी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगत, जगात सर्वात मोठे लिखित संविधान भारताचे असून, कुणीही असंविधानात्मक कामे करू नये, असे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. व्ही. आर. निकम यांनी केले. प्रा. आर. पी. ठाकरे यांनी परिचय करून दिला.केला.
भविष्यात कायद्याचे ज्ञान महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 10:42 PM
संविधान हा भारतीयांचा आत्मा आहे. वर्तमान युग कायद्याचे आहे. जसा कायदा बदलतो तसा समाज बदलतो तशी कालानुरूप साक्षरतेची व्याख्याही बदलत आहे. भविष्यात ज्याला कायद्याचे ज्ञान नसेल तो निरक्षर समजला जाईल, असे प्रतिपादन सटाणा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश ए. व्ही. आव्हाड यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देआव्हाड : प्राध्यापक प्रबोधिनीतर्फे ‘संविधान जनजागृती’