शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

गडावर आज कोजागरी उत्सव

By admin | Published: October 15, 2016 1:34 AM

लगबग : विविध नद्यांच्या जलाने भगवतीला अभिषेक

वणी : नवरात्रीच्या पुण्य पर्वात आईचा जोगवा गाठीशी बांधून भक्त परतीच्या मार्गाला लागतात अन् आदिमायेच्या चरणी तीर्थ अर्पण करण्यासाठी कावडधारकांची लगबग सुरू होते. शेकडो मैलांवरील नद्यांचे तीर्थ कावडीत भरून कवडधारकांची पदयात्रा सुरू झाली आहे. कोजागरी पौर्णिमेला या तीर्थांनी सप्तशृंगी देवीला अभिषेक घातल्यानंतर हे भक्त धन्य होतात. त्याअनुषंगाने मजल-दरमजल करत हे कावडधारक गडाकडे मार्गक्रमण करीत आहेत.पौर्णिमेला मुंबई भागातील तृतीयपंथीयांची मोठ्या प्रमाणावर गडावर उपस्थिती असते. सवाद्य मिरवणुकीत सुवर्णालंकार परिधान करून तृतीयपंथी सहभागी होतात. पौर्णिमेला सायंकाळी अभिषेक प्रारंभाची प्रतिवर्षीची परंपरा आहे. रात्री १२ वाजता अभिषेक पूर्णाहुती व कोजागरीची सांगता असे नियोजन असते. कावडधारकांना प्रवेशासाठी स्वतंत्र मार्ग असतो. यामार्गावर मोफत फराळ, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी आदि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन आखण्यात आले आहे.गोदावरी, नर्मदा, कृष्णा-गिरणा, भीमा, तापी आदि नद्यांचे पाणी घेऊन कावडधारक गडावर पोहोचण्यासाठी मार्गक्रमण करीत आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर, खरगौण, धुळे जिल्ह्यातील शहादा, शिरपूर, साक्री, पिंपळनेर, गुजरात राज्यातील बारडोली-आहवा-डांग, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, मनमाड, दिंडोरी-वणी खेडगाव, सिन्नर, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथील व परिसरातील हजारो कावडधारक गडावर कोजागरी पौर्णिमेला हजेरी लावतात. यापैकी काही कावडधारक तांब्याच्या एका गडव्यातील तीर्थाने वणीच्या जगदंबेलाही अभिषेक घालतात. भगवे वस्त्र, सुशोभित कावड, पायात घुंगरू, जगदंबेचा जयघोष करीत हजारो कावडधारक मजलदरमजल करत गडाकडे मार्गक्रमण करीत आहेत. (वार्ताहर)