पाथरे : सिन्नर तालुक्यातील वावीसह ११ गाव पाणी पुरवठा योजनेच्या कोळगाव माळ येथील तलावाला मुंगेर लागून गळती झाल्याने मोठया प्रमाणावर पाणी वाया गेले. वेळीच पाणीपुरवठा समितीने दखल घेत दुरुसस्तीच्या कामास प्रारंभ केला.तळ्याच्या आतील बाजूस मुंगेर पडल्याने गुरुवारी पहाटे चार वाजेपासून पाण्याची गळती होत होती. पाच तासाच्या अथक प्रयत्नाने दोन जेसीबीच्या साहाय्याने मातीची भर घालून मुंगेर बुजवण्यात आले.पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, वावी, कहांडळवाडी, सायळे, दुशिंगपूर, मिठसागरे, शहा, मिरगाव या गावांना गोदावरी उजवा कालव्यालगत पाथरे बुद्रुक शिवारात बांधण्यात आलेल्या तलावातून ११ गावांना पाणीपुरवठा केला जातो. योजनेच्या कोळगावमाळ येथील तलावाच्या आजूबाजूला काटेरी झाडे झुडपे वाढल्याने भरावाला भगदाड पडते. आता पर्यंत तीन ते चार वेळेस भगदाड पडून पाणी वाया गेले आहे. यावेळी दहा ते बारा लाख लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजू बाजूच्या शेतकऱ्यांना या वाया जाणाºया पाण्यामुळे त्रास होत आहे. त्यांची पीके अतिरिक्त पाण्यामुळे जळून जात आहे. परिसरातील शेतकºयांच्या शेतात पाणी साचले आहे. ऊस, मका, डाळिंब, सोयाबीन, कांदा, घास आदी पिकांना अतिरिक्त पाणी मिळाले आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहे. अनेक दिवस शेतात ओलावा राहत असल्याने शेतात कामे देखील करता येत नाही.पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष किरण घेगडमल, सदस्य सोमनाथ घोलप, गोरक्षनाथ पडवळ, वारेगावचे सरपंच मीननाथ माळी, पाथरे बुद्रुकचे सरपंच शरद नरोडे, बाबासाहेब सोमवंशी, सुरेश नरोडे, सुनिल नरोडे, बाबासाहेब वाणी, सतिष जोर्वेकर, सुखदेव थोरात, पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोविंद मोरे यांना तळ्याला मुंगेर पडल्याचे कळल्यावर त्यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन जेसीबीच्या साहाय्याने मातीचा भराव घालून पाणी गळती रोखण्यात आली. तळ्याच्या आतील बाजूस साधारण पाच ते सहा ट्रॅक्टर मातीचा भराव टाकण्यात आला. तळ्यात जादा पाणी साठा, झाडे झुडपांमुळे मुंगेर पडले असल्याचे समजते. तळ्याच्या आजू बाजूला असणारी काटेरी झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष घेगडमल यांनी सांगितले.गळतीमुळे तळ्यातील पाणी कमी तर होतेच परंतु आजू बाजूच्या शेतकºयांना त्याचा त्रास व आर्थिक हानी सोसावी लागते. कायमस्वरूपी यावर उपाय योजना करण्यांत यावी तसेच अशी मागणी होत आहे.