आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील कोणार्कनगर ते आडगाव हा समांतर रस्ता अद्यापही अर्धवट स्थितीत असल्यामुळे या मार्गावरून एकेरी धोकादायक वाहतूक सुरू आहे. या मार्गावरील अपघातांची संख्या यामुळे वाढत असल्यामुळे सदर रस्ता तत्काळ पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर नियम धाब्यावर बसवून रस्त्याच्या दुतर्फा चुकीच्या बाजूने वाहतूक सुरू असून, त्यामुळे छोटे-मोठे अपघातांत वाढ झाली आहे. शिवाय त्यामुळे शाब्दिक वाददेखील होतात. त्यामुळे कोणार्कनगर ते मेडिकल कॉलेजपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूस समांतर रस्ते तयार करण्यात आले, परंतु समांतर रस्ता आडगावपर्यंत न बनवता कोणार्कनगरपर्यंतच आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक जवळपास अर्धा ते एक किलोमीटर चुकीच्या बाजूने प्रवास करतात. हा रस्ता पार करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. महामार्गावर वाहनांचा वेग प्रचंड असल्यामुळे अपघातांचे प्रमाणदेखील वाढत. याशिवाय रस्त्यावरून जाताना जाणाऱ्या-येणाºयांचे वाददेखील होतात. वाद मिटवण्यासाठी बºयाचदा पोलिसांनादेखील हस्तक्षेप करावा लागतो. शिवाय या मार्गावर आडगाव ग्रामस्थ, पोलीस वसाहतमध्ये राहणारे लोक, ग्रामीण पोलीस मुख्यालयमधील कर्मचारी, भुजबळ कॉलेज, मेडिकल कॉलेज, निसर्ग कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी, पोलीस यांची वर्दळ असते. जवळचा मार्ग असल्याने बरेच लोक एका बाजूने प्रवास करतात, कारण सरळ मार्गाने पुढे जाऊन मागे यावे लागल्याने जास्तीचे अंतर कापावे लागते. शिवाय चौफुलीदेखील क्र ॉस करावी लागत असल्याने वाहतूक कोंडीचीदेखील समस्या निर्माण होते. पेट्रोल टाकण्यासाठीदेखील लोक विरु द्ध दिशेनेच यावे लागते. त्यामुळे कोणार्क नगर ते मेडिकल कॉलेज आडगाव फाटापर्यंत सर्व्हिस रोड पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
कोणार्कनगर ते आडगाव सर्व्हिसरोड अद्यापही अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 11:52 AM
धोकादायक : काम अर्धवट स्थितीत; विरुद्ध बाजूने वाहतूक
ठळक मुद्देधोकादायक : काम अर्धवट स्थितीत; विरुद्ध बाजूने वाहतूक